मुंबई : कोष्टी, हलबा कोष्टी, पद्मशाली यांसह विशेष मागासवर्गातील (एसीबीसी) अन्य जाती या सामाजिकदृष्टय़ा मागास असल्याची माहिती किंवा अभ्यास आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली. या श्रेणीतील दोन टक्के आरक्षणाला देण्यात आलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ही विचारणा केली.

 न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने ही याचिका रिट याचिका आहे की जनहित याचिका असा प्रश्नही केला. ही रिट याचिका असली तरी त्यातील मागण्या या जनहित याचिकेच्या असल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. तसेच याचिकेचे नेमके स्वरूप स्पष्ट करण्याचे आदेशही महानिबंधक कार्यालयाला दिले.

mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
mumbai high court evm purchase marathi news
“न्यायालय टपाल खाते आहे का ?”, मतदान यंत्र खरेदीसंदर्भातील याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्याला खडेबोल
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

 राज्यातील आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. तसेच कोष्टी, हलबा कोष्टी, पद्मशाली यासह विशेष मागासवर्गातील अन्य जाती या मागास असल्याचा कोणताही अभ्यास नाही, असा दावा करत या जातींना विशेष मागासवर्गाचा दर्जा देऊन त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये दोन टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा ८ डिसेंबर १९९४ रोजीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका करण्यात आली आहे.

 युथ ऑफ इक्वालिटी या तरुणांच्या संघटनेने वकील संजीत शुक्ला यांच्यामार्फत या आरक्षणाला आव्हान दिले आहे.