मुंबई : पावसाळ्यात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारती वा संक्रमण शिबिरे कोसळून जीवितहानी होऊ नये यादृष्टीने तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपु योजनेतील विकासकांना दिले आहेत. यासाठी मार्गदर्शक सूचनाही झोपु प्राधिकरणाने जारी केल्या आहेत. या उपाययोजना विकासकांकडून केल्या जात आहेत की नाही यावर प्राधिकरणाचे लक्ष असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झोपु प्राधिकरणाकडून पावसाळापूर्व कामे करण्याच्या सूचना विकासकांना केल्या जातात. त्यानुसार प्राधिकरणाने नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध करून विकासकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या परिपत्रकानुसार संक्रमण शिबिरे सुस्थितीत आहे का, ते धोकादायक झाले नाही ना यादृष्टीने संक्रमण शिबिराची तपासणी करून खात्री करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. निर्माणाधीन प्रकल्पातील, संक्रमण शिबिरातील विद्युत यंत्रणा सुस्थितीत आहेत का ? हेही विकासकांना तपासावे लागणार आहे.

हेही वाचा – मुंबई : साफसफाई केलेल्या नदी-नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

हेही वाचा – मुंबई : शीव रुग्णालयात भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

काही दिवसांपूर्वीच वडाळा येथील झोपु प्रकल्पातील निर्माणाधीन पार्किंग टॉवर कोसळल्याची घटना घडली होती. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही दुर्घटना गंभीर होती. या पार्श्वभूमीवर निर्माणाधीन सर्व प्रकारच्या बांधकामाची तपासणी करावी, कोणतीही दुर्घटना होणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. प्रकल्पस्थळी असलेले जाहिरात फलक अनधिकृत नाहीत ना आणि तेही सुस्थितीत आहेत का हेही विकासकांना तपासण्याची सूचना करण्यात आली आहे. यासह अन्य काही सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या उपाययोजना करण्यात आल्या आहेत का याची तपासणी झोपुच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. तर यासंबंधीचा अहवाल प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे.