मुंबई : कोणत्याही स्त्रिला जास्तीत जास्त तीन वेळा ‘सरोगसी’ची प्रक्रिया करता येईल. तसेच या दरम्यान एकाच भ्रूणाचे रोपण तिच्या गर्भपिशवीमध्ये करण्यास  मुभा असेल, असे नुकत्याच जाहीर झालेल्या सरोगसी कायद्याच्या नियमांमध्ये स्पष्ट केले आहे. सरोगसी कायदा २०२१ मध्ये अस्तित्वात आला. हा कायदा अंमलात आणण्यासाठीचे नियम जूनमध्ये जाहीर झाले आहेत. यानुसार ‘सरोगसी’ रुग्णालय चालविण्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक असून यामध्ये कोणत्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ असणे गरजेचे आहे, हे नियमांमध्ये स्पष्ट केले आहे. ‘

‘सरोगेट मदर’ अर्थात अशा स्त्रिवर जास्तीत जास्त तीन वेळा ‘सरोगसी’ची प्रक्रिया करता येईल. त्यानंतरही मात्र ही प्रक्रिया करता येणार नाही. तसेच तिच्या गर्भपिशवीमध्ये एका वेळी एका भ्रूणाचे रोपण करता येईल. काही विशेष स्थितीमध्ये तीन भ्रूणांचे रोपण करण्याची परवानगी दिली जाईल, असे यात नमूद केले आहे. ‘

Unnatural intercourse, husband,
पतीने अनैसर्गिक संभोग करणे गुन्हा नाही; कायद्याने अशी मोकळीक मिळणे धोकादायक
what is heatwave in marathi
विश्लेषण: वाढत्या तापमानाचा तडाखा किती तीव्र? उष्माघात प्राणघातक कसा ठरतो?
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा

‘सरोगसी’साठी अर्ज करण्याच्या पालकांच्या अटीदेखील या नियमांमध्ये स्पष्ट केल्या आहेत. महिलेला गर्भपिशवी नसल्यास, किंवा काढून टाकली असल्यास किंवा गर्भपिशवी अकार्यक्षम असल्यास अशा महिलेला ‘सरोगसी’ करून घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच कोणत्याही कारणास्तव एकाहून जास्त वेळा गर्भपात झालेला असल्यास, ‘आयव्हीएफ’द्वारे वारंवार प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसल्यास, किंवा कोणत्या आजारामुळे महिला गर्भवती राहणे शक्य नसल्यास, तसेच ती गर्भवती राहणे तिच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्यास या स्थितीमध्ये तिला ‘सरोगसी’ करून घेण्याची मुभा असेल, असे यात नमूद केले आहे.

‘सरोगेट मदर’ आणि ‘सरोगसी’साठी अर्ज करून इच्छिणारे पालक यांच्यामध्ये करार केला जाणार असून याबाबतही सविस्तर नियमावली आहे. सरोगसी करू इच्छिणाऱ्या पालकांपैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यू झाल्यास किंवा अन्य काही कारणास्तव त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यास जन्माला आलेले मूल कोणाच्या स्वाधीन करायचे हे देखील  करारमध्ये पालकांना नमूद करणे बंधनकारक असणार आहे. सरोगसी करून इच्छिणारे पालक आणि ‘सरोगेट मदर’ या दोघांचीही माहिती दवाखान्याद्वारे गुप्त ठेवण्यात येईल.

तीन वर्षांचा विमा बंधनकारक..

‘सरोगेट मदर’ असलेल्या स्त्रिच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रसूती आणि त्यानंतरची गुंतागुंत लक्षात घेऊन तिच्या नावे  तीन वर्षांचा विमा काढणे ‘सरोगसी’ करू इच्छिणाऱ्या पालकांना बंधनकारक असेल. तसेच डॉक्टरांनी गर्भपात करण्याचा सल्ला दिल्यास या  कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार आहे.  मूलाची कोणतीही जबाबदारी सरोगेट मातेची नसेल. एखाद्या स्थितीमध्ये ‘सरोगसी’ करू इच्छिणाऱ्या पालकांनी त्याची जबाबदारी न स्वीकारल्यास  बालकाला त्याच्या पालकांचा वारसा हक्क लागू असेल, असेही यात स्पष्ट आहे.