ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन

विलेपार्ले येथे राहणाऱ्या करमरकरांनी नोकरी सांभाळून जाहिरात आणि चित्रपटातील अभिनयाची आवड त्यांनी जोपासली होती. ‘

मुंबई : ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’, या जाहिरातीतून ‘अलार्म काका’ म्हणून घरोघरी प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन झाले. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांत काम केले होते.

विलेपार्ले येथे राहणाऱ्या करमरकरांनी नोकरी सांभाळून जाहिरात आणि चित्रपटातील अभिनयाची आवड त्यांनी जोपासली होती. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘सास बहू और सेन्सेक्स’ आदी हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम के ले होते. वडिलांच्या किं वा आजोबांच्या छोटेखानी भूमिकांमधून ते अनेकदा समोर आले. मराठी – हिंदी चित्रपटांबरोबरच ‘इंडियन ऑइल’, ‘पेप्सीगोल्ड’, ‘हेन्ज टोमॅटो केचप’, ‘लिनोवो कॉम्प्युटर्स’, ‘एशियन पेंट’ यासारख्या कं पन्यांच्या जाहिरातींतूनही त्यांनी काम केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Veteran actor vidyadhar karmarkar passes away akp

ताज्या बातम्या