मोकाट बिबटय़ाची ‘आरे’मध्ये दहशत

आरे कॉलनीमध्ये दहशत पसरवणाऱ्या बिबळ्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आणखी दोन पिंजरे लावले आहेत.

आरे कॉलनीमध्ये दहशत पसरवणाऱ्या बिबळ्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आणखी दोन पिंजरे लावले आहेत. मात्र या शनिवारी संध्याकाळपर्यंत तरी बिबटय़ा पिंजऱ्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरात दहशत आह़े  
शाळेतून संध्याकाळी घरी परतत असलेल्या प्रकाश साळुंखे या बारा वर्षांच्या मुलाला बिबटय़ाने ठार मारले. शुक्रवारी ही घटना घडल्यावर त्याच रात्री वनविभागाने त्या ठिकाणी काही अंतरावर दोन पिंजरे लावले आहेत. भक्ष्य ठेवलेल्या या पिंजऱ्याकडे रात्री बिबटय़ा फिरकला नाही, असे वनसंरक्षक अधिकारी अनिल तोरडमल म्हणाले. दोन आठवडय़ांपूर्वी आरे कॉलनीच्या याच भागात चार वर्र्षांच्या मुलीला बिबटय़ाने ठार केले होत़े तर त्याच दिवशी संध्याकाळी बारा वर्षांच्या मुलावर हल्ला केला होता. त्या वेळीही या भागात दोन पिंजरे लावण्यात आले होते. मात्र बिबटय़ाला पकडण्यात अपयश आले होते. या वेळी हल्ला केलेला बिबटय़ा तोच असावा़  तो या परिसरात सावजासाठी येत असल्याची शंका वनाधिकाऱ्यांना आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wandering leopard creates terror in aarey colony

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या