मुंबई : महानगरपालिकेतर्फे गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड परिसरातील फोर्टीस रुग्णालय ते उद्योग क्षेत्रालगत असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कारणास्तव येत्या २४ ते २५ मे दरम्यान २४ तासांसाठी घाटकोपर, भांडुप व मुलुंड या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाच्या कामात जलवाहिनीमुळे अडथळा निर्माण होत असल्याने ती वळविणे गरजेचे आहे.

महानगरपालिकेतर्फे दोन ठिकाणी १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम येत्या २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून २५ मे रोजी सकाळी ११.३० या वेळेत करण्यात येणार आहे. मुलुंड (पश्चिम) येथील गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यालगत हे काम केले जाणार आहे. या कालावधीत घाटकोपर, भांडुप व मुलुंड विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहील. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २,२६३ वाहनधारकांवर कारवाई

या विभागात पाणीपुरवठा बंद राहणार

१) एन विभाग – विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालय. ( मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३०) – (२५ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील)

२) एस विभाग – नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व) चा संपूर्ण परिसर, टागोर नगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व) येथील इमारत क्रमांक १ ते ३२ व २०३ ते २१७ ( मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३०) – (२५ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील) मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (ऐशफोर्ड टॉवर, रुणवाल टॉवर, फोर्टिस रुग्णालय ते सोनापूर वाहतूक दिव्यापर्यंतचा परिसर), सीएट टायर मार्ग लगतचा परिसर (सुभाषनगर, एम. एम. आर. डी. वसाहत), गाव रोड, दत्त मंदीर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (भांडुप पश्चिम), सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसर (पहाटे ५ ते सकाळी १०) – (२५ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील)

३) टी विभाग – मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग (डम्पिंग रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालविय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव ( २४ तास पाणीपुरवठा बंद)