‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार-२०२१’

मुंबई : विविध क्षेत्रांत प्रतिकू लतेवर मात करून अतुलनीय काम करणाऱ्या ‘दुर्गां’ची माहिती ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’साठी पाठवण्याची अंतिम मुदत वाढवून २६ सप्टेंबर करण्यात आली आहे. राज्यभरातून वाचकांकडून अशा कर्तबगार स्त्रियांची माहिती नामांकन स्वरूपात प्राप्त होत आहे. त्यांचा वाढता ओघ पाहता ती पाठवण्यासाठीची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून रविवार २६ सप्टेंबरपर्यंत येणाऱ्या नामांकनांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे.

‘लोकसत्ता दुर्गा’ या उपक्रमात गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेला स्त्रीशक्तीचा जागर यंदा आठव्या वर्षीही त्याच उत्साहाने साजरा केला जाणार आहे. सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्र, संशोधन, शिक्षण, कला-मनोरंजन, माहिती-तंत्रज्ञान, उद्योग, क्रीडा, पर्यावरण संरक्षण आदी विविध क्षेत्रांतील भरीव कामगिरी के लेल्या, तसेच आपल्या कामात समाजाभिमुख दृष्टिकोन बाळगून इतर स्त्रियांच्याही प्रगतीसाठी प्रयत्नशील असलेल्या नऊ ‘दुर्गां’चा ‘लोकसत्ता’तर्फे  नवरात्र उत्सवाच्या  निमित्ताने गौरव केला जाणार आहे.

अनेक स्त्रिया प्रतिकू ल परिस्थितीचा सामना करत आपल्या क्षेत्रात उच्चपदी पोहोचतात, काहीजणी आगळ्यावेगळ्या किंवा पुरुषप्रधान क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवतात, काही सामाजिक कार्यात झोकू न देत आदर्श निर्माण करतात, तर काही समाजाची मानसिकता बदलवण्यासाठी प्रयत्न करतात. अशा प्रेरणादायी स्त्रियांचा विचार या पुरस्कारासाठी के ला जातो. त्यासाठी तुमची माहिती किं वा तुमच्या परिचयाच्या कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती आमच्यापर्यंत जास्तीत जास्त लवकर पोहोचवावी.

यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा- २०२१’मध्ये २६ सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवल्या जाणाऱ्या नामांकनांमधून तज्ज्ञ परीक्षकांतर्फे  नऊ स्त्रियांची पुरस्कारासाठी निवड के ली जाणार आहे. नवरात्रातील नऊ दिवस दररोज त्यांच्या कार्याचा परिचय ‘लोकसत्ता’मध्ये दिला जाईल. त्यानंतर होणाऱ्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या दुर्गांचा गौरव के ला जाणार आहे. गेली सात वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमातील ६३ ‘दुर्गां’ची माहिती एकत्रितपणे नुकतीच कॉफी टेबल बुकच्या स्वरूपातही प्रसिद्धही करण्यात आली आहे.

पुरस्काराविषयी-

ही माहिती २६ सप्टेंबर २०२१ पर्यंत ‘लोकसत्ता’कडे पाठवावी.

माहितीबरोबर त्या कर्तृत्ववान स्त्रीचे छायाचित्र, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी पाठवणे आवश्यक.

आलेल्या माहितीमधून परीक्षक समिती नऊ दुर्गांची निवड करेल आणि ती अंतिम असेल.

नवरात्रीत नऊ दिवस दररोज यातील एका दुर्गेची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाईल.

त्यानंतर होणाऱ्या एका दिमाखदार सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते नवदुर्गांचा सन्मान केला जाईल.

हे महत्त्वाचे-

सामाजिक कार्य, वैद्यक क्षेत्र, संशोधन, शिक्षण, कला-मनोरंजन, माहिती-तंत्रज्ञान, उद्योग, क्रीडा, पर्यावरण संरक्षण आदी विविध क्षेत्रांतील ‘दुर्गां’ची माहिती आपण पुरस्कारासाठी पाठवू शकता.

ही माहिती २६ सप्टेंबरपर्यंत पाचशे शब्दांत, मराठीतच आणि नोंदी स्वरूपात फक्त एकदाच पाठवावी.

या स्त्रियांचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे आणि त्या-त्या क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचलेले असावे.

कुठे पाठवाल?

दुर्गांविषयीची माहिती loksattanavdurga@gmail.com  या ई-मेल आयडीवर किं वा टपालाने पुढील पत्त्यावर पाठवावी. ‘लोकसत्ता- महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०’. ई-मेलमध्ये आणि टपालाने पाठवल्या जाणाऱ्या पाकिटांवर ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’साठी असा ठळक उल्लेख करावा. पुरस्कारप्राप्त दुर्गांची माहिती थेट ‘लोकसत्ता’मध्ये ७ ऑक्टोबरपासून प्रसिद्ध होईल. याविषयी कोणताही पत्रव्यवहार किं वा संपर्क  के ला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.