आर्थिक ऐपत नसतानाही ऐन हिवाळ्यात टँकरसाठी निविदा

नागपूर : तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील १२० टँकर बंद करून त्यांच्या महापालिके तील लॉबीवर वचक बसवला होता. पण, मुंढे जाताच ही लॉबी पुन्हा सक्रिय झाली असून आर्थिक स्थिती नसतानाही ऐन हिवाळ्यात प्रशासनाने टँकर्सच्या फे ऱ्या सुरू करण्यासाठी निविदा काढल्या आहेत.

टँकर लॉबीमध्य सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांचा समावेश असून त्यांचेच अनेक टँकर आहेत हे येथे उलेखनीय.  शहरातील सीमावर्ती भागात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचा वापर के ला जातो. महापालिके च्या सेवेत ३४६ टँकर्स होते. टँकर चालक महापालिके कडून पैसे घेत होते आणि पाणी बांधकामासाठी विकत होते. मात्र नगरसेवक किं वा त्यांच्या आप्तस्वकीयांचेच टँकर असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. ही बाब तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ओळखली व मार्च २०२० मध्ये त्यांनी  ३४६ पैकी १२० टँकर्स बंद  करून टँकर लॉबीला धक्का दिला होता. या निर्णयामुळे महापालिके ची सुमारे दर महिन्याला १० ते ११ कोटींची बचत झाली होती.  विशेष म्हणजे,  हा निर्णय घेताना ज्या भगात टँकर जात होते तेथे पाणी पुरवठ्याची सोय के ली होती.

मुंढे यांच्या बदलीनंतर टँकर लॉबी पुन्हा महापालिकेतत सक्रिय झाली. काही भागातील पाणी पुरवठ्याची अडचण पुढे करून पुन्हा टँकर सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला  गेला. अखरे प्रशासनाने यासाठी निविदा काढल्या आहेत.

एकीकडे महापालिका टँकरमुक्त शहर योजना राबवत आहे. लकडगंज झोन डिसेंबरपर्यंत टँकरमुक्त होणार असल्याचे जलप्रदाय विभागाने जाहीर केले. जलवाहिन्यांचा विस्तार के ला जात आहे. नव्या नळ  जोडण्या दिल्या जात आहेत आणि दुसरीकडे टँकरही सुरू के ले जात आहे.

पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करा

मानेवाडा परिसरात भगवती नगरात टँकरचालक ५० रुपये ड्रम प्रमाणे पाण्याची विक्री करत असल्याचा आरोप या भागातील नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे यांनी केला आहे. पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी सोनकु सरे यांनी के ली आहे.

शहरातील अनेक भागात पाणीटंचाई असल्यामुळे नव्याने टँकरसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. जे टँकर बंद करण्यात आले होते, त्यातील काही टँकर सुरू केले जाणार आहे. – विजय झलके, जलप्रदाय विभाग