नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ८०२ पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब घेण्यात आली होती. मात्र, तृतीय पंथीय उमेदवारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून या परीक्षेचा निकाल रखडला आहे. हा विषय मुख्य सचिव यांच्यापर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन त्याला मंजुरी कधी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – देवाच्या नावाने व्यवसाय करणारे मंदिरातील वस्त्रसंहिता ठरवणार का? रेखा दंडिगे-घिया ॲड. स्मिता सिंगलकर यांचा सवाल

Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
BJP, online advertisements, Phir Ek Bar,
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
BJP spent 38 crores in online advertisements in three months
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च; ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ

एमपीएससीच्यावतीने संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास ४ लाख २० हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी ४२ पदे, पोलीस उपनिरीक्षक ६०३ पदे, राज्य कर निरीक्षक ७७ पदे, दुय्यम निबंधक/मुद्रांक शुल्क ७८ अशी एकूण ८०२ पदे आहेत. या पदांसाठी परीक्षा झाल्यावर तृतीय पंथी उमदेवारांसाठी वेगळे निकष ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी समितीने अहवालही तयार केला. मात्र, हा अहवाल अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीत आलेला नाही. त्यामुळे निकाल रखडला आहे.