नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांश खरगे यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संताप व्यक्त करत हे आंदोलन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर हे वीर नव्हते. मी प्रभारी असतो तर सावरकरांचा फोटो विधानसभेतून काढून टाकला असता. या वक्तव्यावरून राज्यभर राण पेटले आहे. त्याचे पडसाद आज विधानभवन परिसरातही दिसून आलेत. परिसरात सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी स्वातंत्र्यविरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या निषेधार्थ निदर्शने केली.

हेही वाचा – नवाब मलिक पुन्हा विधान भवन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात, अजित पवार म्हणतात…

आंदोलनात आशिष शेलार, बंटी भांगडिया, सुनील राणे, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, सीमा हिरे, मोनिका रानजळे, हरीभाऊ बागडे, नमिता मुंदडा, राजेश पाडवी, मंदा म्हात्रे, सुधीर गाडगीळ, राणा जगजितसिंग, उमा खापरे, राम कदम, समीर मेघे सहभागी होते.

हेही वाचा – ‘हात नका लावू कानाला, भाव द्या धानाला’, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक

यावेळी शेलार म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे समस्त क्रांतीकारक आणि देशभक्तांचा अपमान आहे. हा देश त्यांचे बलिदान नाकारू शकत नाही. इंदिरा गांधी यांनी स्वत: त्यांच्या बलिदानाचे समर्थन केले होते. पण, काँग्रेस आणि खरगे वारंवार सावरकरांना बदनाम करत आहे. ते महाराष्ट्रद्रोही असून त्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. त्यामुळे या विषयावर उद्धव ठाकरेंनी जबाब द्यावा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A protest was held in vidhan bhavan area of nagpur against the controversial statement made by priyansh kharge about savarkar mnb 82 ssb
Show comments