बुलढाणा : विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक नोंदवले गेले. आज ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याखालोखाल वाशीम ४१.४ तर विदर्भाच्या तुलनेत ‘सुसह्य तापमान’ असणाऱ्या बुलढाणा शहरानेही ४० चा आकडा पार केला. यामुळे आजचा मंगळवार अकोला, वाशीम आणि बुलढाणावासीयांच्या जीवाची काहिली करणारा ठरला.

मंगळवार, २६ मार्चला बुलढाणा शहरात ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदा आजवरच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान ठरले. या तुलनेत किमान तापमान २२.६ अंश इतके होते. मागील सहा दिवसांपासून बुलढाण्याचे तापमान ३७.४ ते ३७.८ दरम्यान रेंगाळत होते. मात्र, आज तापमानाने चाळीशी पार केली. यामुळे बुलढाणावासीयांसाठी आजचा दिवस असह्य ठरला. रोजे ठेवणाऱ्या हजारो मुस्लीम बांधवांची कठोर परीक्षा घेणारा हा दिवस ठरला.

Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
Solapur recorded the highest degree Celsius maximum temperature in the state
दोन दिवस होरपळीचे! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, रात्रीच्या उकाडय़ातही वाढीचा अंदाज

हेही वाचा >>>“बुलढाण्यातून सुजात आंबेडकर यांनी लढावे किंवा स्थानिक उमेदवार द्यावा,” वंचितच्या बैठकीत ठराव पारित

मार्चमध्ये बुलढाण्याचे कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास राहते. मात्र यंदा त्याने मार्चमध्येच चाळीसचा आकडा पार केला. कमालच्या तुलनेत किमान तापमान २० ते २३ अंशादरम्यान राहत आहे. यामुळे आजार व रुग्ण संख्येत वाढ होत आहे.