अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अकाेल्यात दाखल झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांनी आपल्या दौऱ्याचा ‘श्री गणेशा’ केला. शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत विदर्भातील सहा मतदारसंघांतील तयारीचा ते आढावा घेत नेत्यांना निवडणुकीच्या तयारीचा कानमंत्र देणार आहेत.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह अकोल्यात दाखल झाले. गृहमंत्री अमित शहा यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अकोला विमानतळावर आगमन झाले. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले.

thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता
Will Congress support vanchit bahujan aghadi in the fight between Prakash Ambedkar and Anup Dhotre in Akola
अकोल्यात लढत दुरंगी की तिरंगी? दोन ठिकाणी ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे काँग्रेस…

हेही वाचा – अमरावतीत अडसुळांच्या दाव्‍याने महायुतीत पेचप्रसंग

हेही वाचा – वकिलीची सनद पाच वर्षांसाठी रद्द, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर…

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित होते. अमित शहा यांनी शिवणी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. शहरात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. आढावा बैठकीसाठी ते हॉटेलकडे रवाना झाले. बंद दाराआड ते सहा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेत आहेत.