लोकसत्ता टीम

बुलढाणा : मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी या गावात होळीचा वाद वाढत जाऊन तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवर हल्ले केल्याने किमान १७ गावकरी जखमी झाले. यापैकी ५ गंभीर जखमींना बुलढाण्यात हलविण्यात आले आहे. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज, सोमवारीही गावातील तणाव कायम असून दोन्ही गट डोनगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. गावात नियमित पोलिसांसह दंगा काबु पथकही तैनात करण्यात आले आहे.

titwala farmer death marathi news
टिटवाळ्यात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू, फळेगाव-उतणे गावांमधील शेतकऱ्यांमध्ये वाद
Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

रविवारी रात्री उशिरापर्यंत विठ्ठलवाडीत गदारोळ चालला होता. डोनगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या गावात संध्याकाळी लहान मुलांनी होळी पेटवली. लहान मुलांचा गोंधळ सुरु असताना मुलामध्ये धक्काबुक्की झाली. त्या लहान मुलांनी आपआपल्या घरी जाऊन माहिती दिली .यामुळे रात्री घराघरातील मोठ्या मंडळींमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. लाठ्याकाठ्यां व मिळेल त्या वस्तूनी हल्ले करण्यात आले. यातून महिलाही सुटल्या नाही. यात तब्बल १७ जण जखमी झाले आहे.

आणखी वाचा-“संघर्ष केल्याशिवाय मोठे होता येत नाही…” काय म्हणाल्या प्रतीभा धानोरकर

जखमींना मेहेकर येथील ग्रामीण रुग्णाल्यात भरती केले आहे. ५ गंभीर जखमी असल्याने त्यांना बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. डोंनगाव पोलिसांनी गावात धाव घेतली .अतिरिक्त कुमक दाखल झाली. यानंतर गंभीर जखमींना पोलिसांनी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात भरती केले.उर्वरित जखमीवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे

विठ्ठलवाडी गावात पोलिसांचे दंगाकाबू पथक पोहोचले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे, गावात तणावपूर्ण शांताता असून डोनगाव पोलिसात तक्रार देण्यासाठी दोन्हीकडील मंडळी पोहोचली आहे .