नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. आता येथील कार्यकर्ते कोल्हापूरला प्रचारासाठी जाणार आहेत. त्यासाठी भाजपने रेल्वेगाडीची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा – दलित समाजात अस्वस्थता; भाजपच्या ‘चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा

हेही वाचा – बुलढाण्यात पुन्हा अवकाळीचे थैमान; वीज पडून एकाचा मृत्यू, घरावर झाड कोसळले

भाजप तर्फे कार्यकर्त्यांसाठी आज रात्री पावणे बाराला २० डब्यांची इलेक्शन स्पेशल ट्रेन नागपूरहून कोल्हापूरकरिता रवाना होणार आहे. ही स्पेशल ट्रेन गोरखपूर येथून नागपुरात बोलाविण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पाठवण्याची विशेष काळजी घेत आहे. त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष रेल्वे गाडीसाठी १० लाख खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी साडेचार लाख रुपये देऊन ही गाडी बूक करण्यात आली आहे, अशी माहिती आहे. पुढील टप्प्यात २५ एप्रिलला पुन्हा एक विशेष गाडी नागपूर येथून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन रवाना करण्यात येणार आहे.