scorecardresearch

धक्कादायक..! प्लास्टिकच्या पिशवीत बांधून स्मशानभूमीत फेकून दिला महिलेचा मृतदेह

जवाहरनगर पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या खरबी येथील स्मशानभूमीत अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या स्थितीत आढळून आला.

body woman thrown in crematorium
धक्कादायक..! प्लास्टिकच्या पिशवीत बांधून स्मशानभूमीत फेकून दिला महिलेचा मृतदेह (प्रातिनिधिक छायाचित्र)

भंडारा : तालुक्यातील जवाहरनगर पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या खरबी येथील स्मशानभूमीत अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या स्थितीत आढळून आला. हा प्रकार शुक्रवारी उजेडात आला.

अज्ञात आरोपींनी या महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेह प्लास्टिक पिशवीत बांधून खरबी येथील महामार्गालगत असलेल्या स्मशानभूमीत फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गावातील काही नागरिकांना स्मशानभूमीत मृतदेह दिसल्याने त्यांनी याची माहिती जवाहरनगर
पोलिसांना दिली. अज्ञात महिला ही २५ ते ३५ वयोगटातील असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ओळख पटू नये, म्हणून महिलेचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे.

हेही वाचा – नागपूर : आमदार मिर्झांभोवतालचे संशयाचे ढग गडद; ‘आरटीओ’ लाच प्रकरणात धक्कादायक तपशील उघड

हेही वाचा – वर्धा : आमदार रणजीत कांबळे यांचा तऱ्हेवाईकपणा! पत्रकारांकडून निषेध

मृत महिलेच्या हातात बांगड्या व गळ्यात मंगळसूत्र असून, अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. ग्रामस्थांनी स्मशानभूमीत मोठी गर्दी केली होती. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 10:25 IST

संबंधित बातम्या