चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहापैकी चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर व आर्णी या चार विधानसभा मतदारसंघात ३ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. यातही चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ५६ हजार २१३ मतदार आहेत. त्यामुळे चंद्रपूरसह या चार मतदारसंघातील मतांची आघाडी विजयासाठी निर्णायक राहणार आहे.

या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुधीर मुनगंटीवार व महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर व आर्णी हे चार मतदारसंघ निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार आहे. कारण या भागातील ३ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ५६ हजार २१३ मतदार आहेत. यात शहरी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. तसेच मुनगंटीवार चंद्रपूरचे रहिवासी असल्याने भाजपसाठी ही जमेची बाजू आहे. तर आर्णी विधानसभा मतदारसंघात ३ लाख १४ हजार ३७६ मतदार आहेत.

Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…
Pratibha Dhanorkar
चंद्रपूर : बंदव्दार चर्चेत काय ठरले? आमदार प्रतिभा धानोरकरांनी घेतली नाराज विजय वडेट्टीवारांची भेट
Chandrapur Congress Candidate pratibha dhanorkar Faces Backlash for Accept Lakshmi and Vote Remark
निवडणुकीत ‘लक्ष्मी’ स्वीकारा आणि मतदान करा, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
chandrapur, sudhir mungantiwar, kishor jorgewar, support, election, will not help, in future, bjp, lok sabha 2024, maharashtra politics, marathi news,
सुधीर मुनगंटीवार म्हणतात,’ जोरगेवारांनी आता मदत केली नाही तर मी त्यांना…

हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आर्णी या एकमेव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार आघाडीवर होते. या क्षेत्रात भाजपचे आमदार संदीप धुर्वे आहेत. राजुरा विधानसभा मतदारसंघात ३ लाख १३ हजार ३५१ मतदार आहेत. कुणबीबहुल या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे आहे. ते येथून सलग दोन निवडणुका जिंकले. तरी येथे भाजप तिसऱ्या क्रमांकावर असल्याने काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना हा मतदारसंघ आघाडीसाठी पोषक आहे.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात ३ लाख ९७८ मतदार आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सलग तीन वेळा या क्षेत्रातून विजय मिळवला. या भागात त्यांचे वर्चस्व आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार ३३ हजारापेक्षा अधिकच्या मताधिक्यांनी विजयी झाले. विशेष म्हणजे, मुनगंटीवार यांना एकूण मतदानाच्या ४३ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे लोकसभेत मुनगंटीवार यांना बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ पोषक राहणार आहे.

हेही वाचा – ‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…

कुणबीबहुल वणी विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार ७३९ मतदार आहेत. येथे भाजपचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार आहेत. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी दोन हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली होती. येथे आमदार भाजपचा असला तरी काँग्रेससाठी येथे पोषक वातावरण आहे.

भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघात २ लाख ७१ हजार मतदार आहेत. काँग्रेस उमेदवार आमदार धानोरकर या विधानसभेत वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धानोरकर यांना ६३ हजार ८६२ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री संजय देवतळे यांना ५३ हजार ६६५ मते मिळाली होती. तर मनसेचे रमेश राजुरकर यांना ३४ हजार ८४८ मते मिळाली होती. धानोरकर यांना दहा हजारांच्या मतांची आघाडी तसेच २०१९ च्या लोकसभेत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना निर्णायक आघाडी मिळाली होती. मात्र २०२४ मध्ये आज परिस्थिती बदलली आहे. दिवंगत मंत्री देवतळे यांचे पुत्र भाजपात आहेत तर गेल्या वेळेस मनसेचे उमेदवार असलेले रमेश राजुरकर भाजपचे वरोरा विधानसभा प्रमुख आहेत. एकूण सहापैकी काही विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी तर काही काँग्रेससाठी पोषक आहेत.

हेही वाचा – निवडणूक रोखे घोटाळा म्हणजे ‘मोदीगेट’; स्वतंत्र आयोगातर्फे चौकशीची मागणी

महिला मतदार

महिला मतदारांची संख्या चंद्रपूर क्षेत्रात १ लाख ७४ हजार ७७५ आहे तर आर्णीत १ लाख ५२ हजार ९६१ आहे. लोकसभा क्षेत्रात ८ लाख ९१ हजार २४० महिला मतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील २४ हजार १२० मतदार आहेत. तर ८५ वर्षांवरील १६ हजार ६२१ मतदार आहेत. नवमतदार व वयोवृद्ध मतदारांसोबत महिला मतदार या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे.