महेश बोकडे

नागपूर : वॉशरीजमध्ये कोळसा धुतल्यावर त्यातील राख कमी होते व आर्द्रता (मॉईश्चर) काही प्रमाणात वाढते. परंतु महानिर्मितीसाठी काम करणाऱ्या खासगी वॉशरीजमध्ये धुतलेल्या कोळशात वरील बाबी दिसून येत असल्या तरी त्या निकषापेक्षा खूप अधिक आहेत. तरीही वॉशरीजवर कारवाई होत नसल्याने त्यांना झुकते माप का, असा सवाल केला जात आहे.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

वीज निर्मितीसाठी महानिर्मितीने घेतलेला कोळसा प्रथम कोल वॉशरीजमध्ये जातो. तेथे धुतलेला कोळसा एका खासगी त्रयस्थ कंपनीत व महानिर्मितीच्या प्रयोगशाळेत तपासला जातो. या तपासणीत वॉशरीजने धुतलेल्या कोळशाचा दर्जा निकषानुसार नसल्याचे महानिर्मितीने खनिकर्म महामंडळाला दिलेल्या नोटीसमधून स्पष्ट होते. महानिर्मितीसाठी एसईसीएल कोल कंपनीकडून कोलवॉशरीजने ऑगस्ट २०२१ मध्ये कोळसा घेतला होता. यात आर्द्रतेचे प्रमाण ११.६० टक्के होते. धुतल्यावर ते वाढून १५.३८ टक्के झाले. ते खनिकर्म महामंडळाने विविध वॉशरीजसोबत केलेल्या करारातील निकषापेक्षा १.७८ टक्के अधिक होते.

ऑक्टोबर-२०२१ मध्ये कच्च्या कोळशात आर्द्रतेचे प्रमाण ११.८८ टक्के होते. स्वच्छ केल्यावर हे प्रमाण १४.२८ टक्के झाले. तेही निकषापेक्षा ०.९१ टक्के अधिक होते. वेकोलिकडून डिसेंबर २०२१ मध्ये उचललेल्या कच्च्या कोळशात ओलाव्याचे प्रमाण १५.४२ टक्के होते. स्वच्छ केल्यावर १६.४७ टक्के झाले. ते सुद्धा निकषापेक्षा ०.०५ टक्के अधिक होते. एसईसीएलकडून उचल केलेल्या कच्च्या कोळशात आर्द्रतेचे प्रमाण ११.८३ टक्के होते. स्वच्छ केल्यावर १५.४७ टक्के झाले. निकषापेक्षा २.६४ टक्के अधिक होते. हे येथे उल्लेखनीय.  कोळसा धुतल्यावर त्यातील राखेचे प्रमाण कमी होते. परंतु ते सुद्धा निकषापेक्षा अधिक आढळले. जुलै२०२१ मध्ये एसईसीएलकडून उचललेल्या कच्च्या कोळशात राखेचे प्रमाण ३९.१८ टक्के होते. धुतल्यानंतर ते ३३.१८ टक्क्यांवर गेले. ते निकषापेक्षा २.१८ टक्के अधिक होते. ऑगस्ट २१ मध्ये वेकोलिकडून घेतलेल्या कच्च्या कोळशात राखेचे प्रमाण ३९.७५ होते. धुतल्यानंतर ३२.५५ टक्के झाले. ते निकषापेक्षा १.५५ अधिक होते. ऑक्टोबर २१ मध्ये वेकोलिच्याच कच्च्या कोळशात राखेचे प्रमाण ३३.७३ होते. कोळसा धुतल्यानंतर ३५.१३ टक्के म्हणजे निकषापेक्षा ४.१३ अधिक दिसून आले. तर एसईसीएलच्या कच्च्या कोळशात राखेचे प्रमाण ३६.४२ टक्के होते. स्वच्छ केल्यावर ते निकषाहून ४.६४ अधिक म्हणजे ३५.६४ टक्के होते.

बॉयलरमध्ये नाकारलेला कोळसा?

 कोराडी वीज प्रकल्पात सर्वाधिक प्रमाणात धुतलेला कोळसा वापरला जात आहे. प्रत्यक्षात वॉशरीजमधून कोळशाचा पुरवठा करतानाच त्यातून नाकारलेला कोळसा (रिजेक्टेडकोल) वेगळा करणे अपेक्षित आहे. परंतु त्यानंतरही कोराडी प्रकल्पातील गिरणीत (बॉयलर) कोळसा बारीक करून टाकताना त्यातून ‘रिझेक्ट’ कोळसा निकषापेक्षा जास्तच निघत असल्याचे लोकसत्ताकडे उपलब्ध कागदपत्रातून दिसत आहे. त्यामुळे वॉशरीजमधून आलेल्या स्वच्छ कोळशाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे.

कोळसा यार्डात सीसीटीव्ही नाही 

राज्य खनिकर्म महामंडळाने विविध खासगी कोल वॉशरीजसोबत केलेल्या करारानुसार रिजेक्टेड कोळसा जेथे ठेवला जातो, त्या यार्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. परंतु ते लावण्यात आले नाही, असे महानिर्मितीने केलेल्या एका वॉशरीजच्या निरीक्षणात दिसून आले.

नियमभंग झाल्यास कारवाई – महानिर्मिती 

यासंदर्भात महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी ईमेलद्वारे याबाबत भूमिका मांडली. कोळसा धुतल्यावरही त्याच्या मापदंडामध्ये सुधारणा झालेली नसेल तर करारानुसार महानिर्मिती कारवाई करते. कोळसा स्वच्छ करताना त्यातून अनावश्यक वस्तू काढल्या जातात. त्यानंतर कोराडी किंवा अन्य प्रकल्पाच्या बॉयलरमधून नाकारलेला कोळसा निकषापेक्षा जास्त निघत नाही, असे त्यात स्पष्ट केले गेले. रिजेक्ट कोलच्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याबाबत महानिर्मितीने थेट उत्तर दिले नाही. मात्र नाकारलेल्या कोळशाची विल्हेवाट करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळावर असल्याचे सांगितले. तसेच कोल कंट्रोलर विभागाकडून परवानगी प्राप्त करून वॉशरीज ‘रिजेक्ट कोल’ची विक्री करीत असल्याचा दावा केला.