Premium

कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्या भाजप नेत्यांच्या, अनिल देशमुख म्हणाले ‘जातनिहाय सर्वेक्षण…’

सरकारी नोकरभरती बंद करून १३७ संवर्गातील शासकीय नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने बाह्य स्त्रोतांच्या कंपन्यांमार्फत भरल्या जाणार आहेत.

Anil-deshmukh
कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्या भाजप नेत्यांच्या असल्याचा आरोप माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांनी केला.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : सरकारी नोकरभरती बंद करून १३७ संवर्गातील शासकीय नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने बाह्य स्त्रोतांच्या कंपन्यांमार्फत भरल्या जाणार आहेत. या कंपन्या भाजप नेत्यांच्या आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांनी केला.

आणखी वाचा-Monsoon Update: मान्सूनच्या परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून

गडचिरोली येथे गुरुवारी कुणबी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभाग दर्शविण्यासाठी ते गडचिरोली येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधला. बिहार राज्याने जातनिहाय सर्वेक्षण केले आहे, असे सर्वेक्षण महाराष्ट्राने करावे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अन्यथा समाजात तेढ निर्माण होऊ शकते, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, संजय ठाकरे, विजय गोरडवार, रमन ठवकर, राजेंद्र वैद्य आदी उपस्थित होते.

धर्मरावबाबांना मंत्री बनायचेच होते

ईडीचा धाक दाखवत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडले. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांना ईडीचा धाक दिला नव्हता. त्यांना मंत्री बनायचे होते. त्यामुळे ते भाजप सरकारमध्ये सहभागी झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Contract recruitment companies are owned by bjp leader says anil deshmukh ssp 89 mrj

First published on: 06-10-2023 at 12:20 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा