चार महिन्यात १६ कोटींची उलाढाल

उन्हाळ्यात नागपूरचे तापमान इतर शहरांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे घर थंड ठेवण्यासाठी नागपूरकर विविध उपाययोजना करत असतात. छतावर हिरव्या जाळ्या (ग्रीन नेट) लावून घर थंड करण्याला नागपूरकर प्राधान्य देतात. बाजारात नेटची मागणी वाढली असून चार महिन्यात  सोळा कोटींची उलाढाल  होते.

Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी
Hyundai Creta facelift
६ एअरबॅग्स अन् ७० हून अधिक सेफ्टी फीचर्स असलेल्या SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; ३ महिन्यात १ लाख कारची बुकींग
byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर

उन्हाळ्यात मराठवाडा आणि विदर्भाचे तापमान अधिक असते. उन्हाळ्यात नागपूरचे तापमान अनेकदा चाळिशी पार गेल्याची अधिकृत नोंद आहे. अशात शहरात सिमेंटचे रस्ते आणि मेट्रोच्या कामांमुळे यंदा तापमान अधिक राहील, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे घरात देखील उष्मा कमी करण्यासाठी नागपूरकरांनी ग्रीन नेट लावण्याचा धडाका लावला आहे. कॉटन मार्केटमध्ये दररोज नागरिकांची मोठी गर्दी नेट खरेदी करण्यासाठी होत आहे. दोन ते तीन प्रकारात ही नेट बाजारात उपलब्ध असून जवळपास पन्नास,पंचाहत्तर ते ऐंशी टक्के उष्णता कमी करण्याची क्षमता या नेटमध्ये आहे. घराच्या छतावर पडणारे थेट उन्ह आणि त्यामुळे घरात होणारी उष्णता कमी करण्यासाठी तसेच फ्लॅटच्या गॅलरीतून थेट घरात येणाऱ्या  उन्हापासून बचावासाठी नागपूरकर या नेटचा आधार घेत आहेत. चाळीस रुपयांपासून तर नव्वद रुपये फूट असे   नेटचे दर आहेत. उष्णता कमी करण्याच्या क्षमतेप्रमाणे दर ठरवण्यात आले आहेत.

घरातील उष्णता कमी करण्यासाठी काही जण घरात पांढरा रंग मरतात, तर काही जण तापमान कमी करण्यासाठी घरात छोटी झाडे लावतात. मात्र त्यापेक्षा नेट लावणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. घराच्या छतावर असलेली झाडे असो किंवा चारचाकीला उन्हापासून वाचवण्यासाठी याची खरेदी जोरावर आहे. आपल्याकडे या ग्रीन नेटचे कारखाने बोटावर मोजण्याइतके होते मात्र, अलीकडच्या सहा-सात वर्षांत याची संख्या पन्नासच्यावर गेली आहे. पूर्वी दिल्ली, मध्यप्रदेश, इंदूर येथून मोठय़ा प्रमाणत नेट नागपुरात येत होत्या. मात्र अनेक कारखाने झाल्याने आता येथून नेट मराठवाडा, जबलपूर आणि भोपाळला जात आहे. जवळपास तीन ते चार वर्षे त्या टिकतात.