चंद्रपूर : गोंडपिंपरी येथे गोंडपिपरी पोलिसांनी व कृषी विभागाच्या भरारी पथकाने गुरुवार २३ मे च्या रात्री बारा वाजता दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एका आरोपीला २५ लाखाचे चोर बीटी बियाणे वाहतूक करताना बियाणे जप्त केले. अनधिकृत चोर बीटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही .कृषी विभागाने अनधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. मात्र गोंडपिंपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असल्याने व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने चोरबीटी बियाणे वाहतूक होत असते.

शेतकऱ्यांना चोर बीटी विक्री करून फसवणूक केली जात आहे.या सगळ्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी कृषी विभाग,पोलीस विभाग हे अलर्ट आहेत. ठाणेदार रमेश हत्तिगोटे व पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना गुरूवार २३ मे रात्री १२ वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर गोंडपिपरी पोलिसांनी आकाश गणेश राऊत वय (२४) रा.अहेरी, जिल्हा गडचिरोली यांचे ( क्रमांक एम. एच. ३४ एम ८६३५) वाहनाची तहसिल कार्यालय गोंडपीपरी समोर वाहन थांबवून झडती घेतली असता वाहनात अनधिकृत कापूस बियाणे १२.९० क्विंटल २५.८० लाख रुपये किमतीचे बियाणे सापडले.

हेही वाचा…राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालानेच पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र रद्द !

संबंधित बीटी वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चौकशी व कारवाई प्रक्रिया पार पडली. ही कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का,पोलीस उपपविभागीय अधिकारी शिवलाल भगत,विकास पाटील संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण आयुक्तालय,जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार,मुख्य गुणवंत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख,कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, उपविभाग कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी,कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पंचायत समिती कृषिअधिकरी महेंद्र डाखरे, मोहीम अधिकारी लंकेश कटरे,श्रावण बोढे,विवेक उमरे,पोहवा देविदास सुरपाम,मनोहर मत्ते,शांताराम पाल, प्रशांत नैताम,पूनेश्वर कुळमेथे यांनी कार्यवाही केली. चोरबीटी बियाणे, युरिया खत व पिकप वाहन असा एकूण ३० लाख ८६ हजार २९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.