चंद्रपूर : ऑनलाइन जुगारावर बंदी असताना सर्रासपणे लाखोंचा जुगार खेळला जात आहे. काँग्रेसच्या असंघटित कामगार सेलचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष विनोद संकत यांच्या जुगार अड्ड्यावर छापा मारून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान यानंतर जामिनावर त्याची सुटका केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे व्हिडीओ गेम पार्लर चालक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक व्हिडीओ गेम पार्लर सुरु आहेत. मनोरंजनासाठी या व्हिडीओ गेमला परवानगी दिली असली तरी ‘क्वॉइन’च्या नावाखाली पैसे लावून सर्रासपणे जुगार खेळला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात ऑनलाइन जुगारावर बंदी आहे. त्यामुळे व्हिडीओ गेम पार्लर चालकांनी अशी शक्कल लढविली आहे. या पार्लरमधील मशीन ‘सेट’ करून ठेवल्या जातात. त्यामुळे जुगाराची लत लागलेले कोणीही जिंकत नाही. अनेक जणांच्या संसाराची राखरांगोळी झाली. काहींनी आत्महत्या केली. व्हिडीओ गेम पार्लर चालक मात्र करोडपती झाले. या पार्लरमध्ये असा प्रकार चालत असल्याची बाब पुढे येताच पोलिसांनी धाड टाकून साहित्य जप्त करत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : आता जंगलातला वाघ अवघ्या ३० सेकंदात मोबाईल आणि संगणकावर येणार, काय आहे हे ‘ट्रेलगार्ड एआय’ तंत्रज्ञान

काँग्रेसच्या असंघटित कामगार सेलचा जिल्हाध्यक्ष विनोद संकत याला अटक केली. येथील सपना टॉकीज जवळ संकत याचे पार्लर आहे. तिथेही हाच प्रकार झाला. पोलिसांनी इतरांची सुटका केली आहे. विनोद संकतला ताब्यात घेतले. या प्रकरणी या कारवाईमुळे विनोद संकतविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur police raid gambling den run by congress workers cell president vinod sankat rsj 74 css
Show comments