Premium

रोहणा गावात दोन गटात वाद; गोळीबारात एक ठार, दोघे गंभीर जखमी; खामगाव तालुक्यासह जिल्हा हादरला!

जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Rohana village Buldhana one person killed two were seriously injured dispute two groups caste
रोहणा गावात दोन गटात वाद; गोळीबारात एक ठार, दोघे गंभीर जखमी; खामगाव तालुक्यासह जिल्हा हादरला! (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

बुलढाणा: बुलढाणा मार्गावरील रोहणा (ता खामगाव) गावात एकाच जातीच्या दोन गटात झालेल्या वादाचे भीषण घटनेत पर्यवसन झाले. यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. आज गुरुवारी ही खळबळजनक घटना घडली. यामुळे खामगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्हा हादरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या घटनेचा विस्तृत तपशील मिळू शकला नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार गावालगत पारधी समाजाची राहुटी आहे. तिथे आज गुरुवारी पारधी समाजाचेच काही व्यक्ती आले. या दोन्ही गटात गंभीर कारणावरून कडाक्याच्या वाद झाला. वाद टोकाला गेल्याने एका गटातील तिघांनी दुसऱ्या गटातील व्यक्तींवर बेछूट गोळीबार केला.

हेही वाचा… अशोक चव्हाण म्हणाले ‘काय सत्यजित’ … तांबेंचे उत्तरही दिलखुलास

गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. अवैध शस्त्र खरेदी विक्रीच्या व्यवहारातून वाद झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र याला पुष्टी मिळाली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In rohana village buldhana one person was killed and two were seriously injured in a dispute between two groups scm 61 dvr

First published on: 07-12-2023 at 16:47 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा