नागपूर : राज्यातील नागपूर, पुणे, अमरावती, अकोला, यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील माता मृत्यू व उपजत मृत्यूची (गर्भातच बाळाचा मृत्यू) तुलना केल्यास नागपूरपेक्षा पुणे येथे उपजत मृत्यू अधिक आहेत, तर माता मृत्यूमध्ये नागपूर समोर असल्याची धक्कादायक माहिती आहे.

पुणे येथे एप्रिल २०१९ ते मार्च २०२० दरम्यान ८९८, नागपूर ७०८, अमरावती ६८३, अकोला ५४९, यवतमाळ १८३ उपजत मृत्यू झाले. एप्रिल २० ते मार्च २१ मध्ये पुणे ७७८, नागपूर ५९०, अमरावती ६४८, अकोला ४६४, यवतमाळ ८९ तर एप्रिल २१ ते मार्च २२ मध्ये पुणे १,०१३, नागपूर ४६७, अमरावती ५८४, अकोला ५५०, यवतमाळ ७२ उपजत मृत्यू झाले. एप्रिल २२ ते मार्च २३ मध्ये पुणे १,१५६, नागपूर ५६०, अमरावती ६२६, अकोला ५१०, यवतमाळ ६८ तर एप्रिल २३ ते डिसेंबर २३ मध्ये पुणे ७४३, नागपूर ३१३, अमरावती ३४७, अकोला ३१०, यवतमाळ २२ उपजत मृत्यू झाल्याचेही माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले. त्यामुळे पाचपैकी पुणेमध्ये सर्वाधिक उपजत मृत्यू झाल्याचे दिसत आहे. तर जानेवारी २०२० ते मार्च २०२० मध्ये नागपुरात ३४, पुणे १५, अमरावती १०, अकोला ६, यवतमाळ ६ माता मृत्यू झाले. एप्रिल २० ते मार्च २१ मध्ये नागपूर १३३, पुणे ८०, अमरावती ५५, अकोला ४६, यवतमाळ १८ तर एप्रिल २१ ते मार्च २२ मध्ये नागपूर १७६, पुणे १३६, अमरावती ३३, अकोला ४५, यवतमाळ २७ माता मृत्यू झाले. एप्रिल २२ ते मार्च २३ मध्ये नागपूर १३५, पुणे १२६, अमरावती २७, अकोला २५, यवतमाळ ३५ तर एप्रिल २३ ते डिसेंबर २३ मध्ये नागपूर ८२, पुणे ८४, अमरावती २९, अकोला १५, यवतमाळ २३ माता मृत्यू झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले.

हेही वाचा – नागपूर : लहान मुले मोबाईल चोरी करायचे अन म्होरक्याला नेऊन द्यायचे…

माता मृत्यूची स्थिती

हेही वाचा – वरिष्ठाने ‘बॉसगिरी’ करून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली, चिडलेल्या दोघांनी…


उपजत मृत्यूची स्थिती