लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : लठ्ठपणाबाबत मुंबईत एक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार घरात एक मनोरंजनाची वस्तू आणल्यास संबंधिताचे वर्षाला ८ किलो वजन वाढते, अशी माहिती पद्मश्री व सुप्रसिद्ध मधूमेह तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी दिली.

ऑल इंडिया असोसिएशन फॉर ॲडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटी संघटनेची लठ्ठपणावर आंतराष्ट्रीय परिषद नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये शनिवारी सुरू झाली. या परिषदेत डॉ. जोशी म्हणाले, जगाची लोकसंख्या ८ अब्ज आहे. त्यापैकी १ अब्ज नागरिकांना मधू्मेह आहे किंवा ते मधूमेहाच्या उंबरठ्यावर आहेत. जुलैमध्येही एक शोध निबंध प्रकाशित झाला. त्यानुसार १०१ दशलक्ष नागरिकांना मधूमेह आहे. १३६ दशलक्ष नागरिक मधूमेहाच्या उंबरठ्यावर आहेत.

आणखी वाचा-गोंदिया: पाणीपुरी विक्रेत्याला क्रेन धडकली, जागीच सोडला जीव…

लठ्ठपणा असलेल्यांना मधूमेहाची जोखीम जास्त असते. शरीरातील चरबी ही लठ्ठपणाला कारणीभूत ठरते. सडपातळ असलेल्या व्यक्तीमध्येही लठ्ठपणाचे निदान होते. मुंबईत मनोरंजनाच्या वस्तू असलेल्या टीव्ही, मोबाईल व इतर मनोरंजनाच्या वस्तूंबाबत एक अभ्यास करण्यात आला. त्यात एका वस्तूमुळे वर्षाला व्यक्तीचे ८ किलो वजन वाढते, असे समोर आले. या वस्तूंमुळे फिरणे कमी होते, खानपानात बदल होतो, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले. याप्रसंगी सुप्रसिद्ध मधूमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता उपस्थित होते.

लठ्ठपणा, मधूमेह वाढण्याची ही आहेत कारणे…

भारत हा कृषीप्रधान देश आहे. प्राचिन काळात भारतात बहुतांश नागरिक कृषी वा त्यावर आधारित काम करत होते. त्यामुळे शरीरयष्टी सशक्त होती. परंतु आता बैठी जीवनशैली, मनोरंजनाच्या वस्तूंमुळे श्रम कमी झाले. त्यामुळे चरबी कमीच होत नाही. त्यातून लठ्ठपणा व मधूमेह वाढत असल्याचे, डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Just one item of entertainment increases your weight by eight kilos says dr shashank joshi mnb 82 mrj
Show comments