लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने जम्मू तवी – तिरुपती हमसफर एक्सप्रेसमधील वातानुकूलित डब्यातून ८८, ५०० रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला. नागपूर आरपीएफला तिरुपती हमसफर एक्स्प्रेसमध्ये विदेशी मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. आरपीएफच्या गुन्हे गुप्तचर शाखा निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे गुप्तचर शाखा, आरपीएफचे उपनिरीक्षक, अमली पदार्थ पथक आणि श्वान पथक यांनी संयुक्त कारवाई केली.

आणखी वाचा-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

नागपुरात ४ मे रोजी ही गाडी आल्यानंतर कसून तपासणी करण्यात आली. या गाडीच्या बी/४ आणि बी/१४ या वातानुकूलित डब्यात मद्यसाठा जप्त करण्यात आला. आसन (बर्थ)क्रमांक ५२, आसन क्रमांक १५ आणि आसन क्रमांक ४५ च्या खाली तीन पिशव्यासंशयास्पद आढळून आल्या. या आसनावर बसलेल्या प्रवाशांच्या या पिशव्या असल्याचे स्पष्ट झाले. त्या पिशव्या उघडून बघितले असताना त्यात विदेशी मद्याच्या २८ बॉटल्या होत्या. त्याची किंमत सुमारे ८८ हजार ५०० रुपये आहे. या आसानावरील तीन प्रवाशांना अवैध दारू बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liquor was found under seat the of train in three bags rbt 74 mrj