नागपूर : अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा ३० सप्टेंबरपर्यंत तयार होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत कमी दाबाचा पट्टा मालदा ते मणिपूरपर्यंत पाहायला मिळत आहे. तसेच मध्य महाराष्ट्र ते झारखंडपर्यंत कमी दाबाच पट्टा सक्रीय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार असल्यामुळे हवामान खात्याने आज विदर्भ आणि कोकण भागात मेघगर्जनासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचप्रकारे मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, यामुळे हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. भारतातून मॉन्सून माघारी जात असताना महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा – नागपूरवर आता संसर्गजन्य आजारांचे सावट! ‘या’ रोग आजाराचा सर्वाधिक धोका

हेही वाचा – “…तर मध्य, पूर्व नागपूर पुरात बुडाले असते”, असा दावा का केला जातो?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ आदी ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low pressure zone in andaman sea till september 30 rgc 76 ssb
First published on: 25-09-2023 at 11:46 IST