नागपूर : शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्च २०२४ (शुक्रवार) पासून नवीन दर लागू होणार आहे. सध्याच्या भाड्याच्या तुलनेत ३३ टक्के भाडे कमी करण्यात आले आहे.

नवीन भाड्यामुळे इतर कुठल्याही सवलतीवर याचा प्रकारचा परिणाम होणार नसून महा मेट्रोद्वारे विध्यार्थ्यांना प्रदान करण्यात येत असलेली ३० टक्के सवलत कायम राहणार आहे. नागपूर हे देशातील सर्वात उष्ण शहरांपैकी एक असून उन्हाळ्यातील तापमान अनेकदा ४५ अंश सेल्सिअसच्या पार करत असते व शहरातील रस्ते रिकामे होऊन नागरिक कमी प्रमाणात घरा बाहेर पडत असतात. महा मेट्रोने प्रवासी भाड्या मध्ये बदल करून एका प्रकारे कमी भाड्यात वातनुकूलित मेट्रो डब्यांमधून प्रवास करून उष्णतेवर मात करण्याची संधी दिली आहे.आता नागपूरकर या उन्हाळ्यात आरामात प्रवास करता येणार आहे

हेही वाचा…लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

सध्यास्थितीत सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर पर्यंत मेट्रोने प्रवास केल्यास ३० रुपये द्यावे लागतात जे की आता २५ रुपये एवढे असतील व ३० टक्के विध्यार्थी सवलतीसह हे १८ रुपये एवढे असेल.

अलीकडच्या काळात, नागपूर मेट्रोची प्रवासी संख्या ७५ हजारच्या आसपास असून, पूर्वीप्रमाणेच प्रवासी संख्या सव्वा लाखापर्यंत मिळवणे हा या सुसूत्रीकरणाचा उद्देश आहे. याच महिन्यात म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी प्रवासी संख्या ९५ हजार एवढी होती. १ जानेवारी २०२३ रोजी महा मेट्रोची आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या २ लाख एवढी होती. महा मेट्रोने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असून यामध्ये विकेंड सवलत (३०%), राजपत्रित सुट्टी सवलत (३०%), डेली पास (केवळ १०० रुपयात) उपाय योजना केल्या आहेत.

हेही वाचा…काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका

महा मेट्रोने नुकतेच कस्तुरचंद पार्क, दोसर वैश्य चौक, प्रजापती नगर, शंकर नगर, लोकमान्य नगर, छत्रपती नगर, जय प्रकाश नगर आणि उज्वल नगर या स्थानकांवर फिडर ऑटोरिक्षा सेवा सुरू केली आहे या व्यतिरिक्त नागपूर मेट्रो,नागपूर महानगर पालिका) आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने विमानतळ ते एयरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यत शटलबस सुरू केली आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : पोटासाठी बंद खाणीतून कोळसा काढताना मृत्यू, ढिगाराच अंगावर कोसळला

सध्या खापरी, प्रजापती नगर, ऑटोमोटिव्ह चौक आणि लोकमान्य नगर या चार टर्मिनल स्थानकांवरून दररोज सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दर १५ मिनिटांनी (सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ७ वाजता दरम्यान) दर १० मिनिटांनी सुरु असून सदर हेडवे देखील कमी करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे.