वर्धा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र सेट ही प्राध्यापक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती.महाराष्ट्र व गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केवळ ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहे.

एकूण १ लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ५१ हजार ५१२ मुलं तर ६८ हजार २७६ मुलींनी नोंदणी केली. त्यापैकी अनुक्रमे ४३ हजार ५१७ व ५७ हजार ७२३ मुलामुलींनी परीक्षा दिली. मुलांचे पात्र ठरण्याचे प्रमाण ८. २० टक्के तर मुलींचे प्रमाण ५. ३८ टक्के आहे. सेटमध्ये मुली मागे पाडल्याचे चित्र आहे.

maharashtra state examination council marathi news
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी मात्र नाही, कारण काय? जाणून घ्या
State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?

हेही वाचा – एमपीएससीचा निम्न श्रेणी लघुलेखक पदाचा निकाल जाहीर, येथे पहा निकाल

तसेच १७ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यात दोन पात्र ठरले. तर ३७२ दिव्यांग व ६८ अनाथ विद्यार्थ्यांपैकी अनुक्रमे ३३७ व ६० विद्यार्थ्यांना यश आले. एकूण ७१ विषयांसाठी ही परीक्षा झाली. सेटच्या लिंकवर सविस्तर निकाल उपलब्ध आहे.