मूल्यांकनाबाबत शिक्षण मंडळासमोर अडचणी

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर व अमरावती विभाग कार्यालयात पूर्णकालीन अध्यक्ष व सचिव नसल्यामुळे  या दोन्ही कार्यालयाचे काम प्रभारींच्या भरवशावर चालत आहे. यंदा परीक्षा न झाल्याने मूल्यांकनाच्या प्रक्रियेतही बदल झाला आहे. असे असतानाही पूर्णवेळ अध्यक्ष व सचिव नसल्याने शिक्षण मंडळासमोर अडचण निर्माण झाली आहे.

इयत्ता नववीचे पन्नास टक्के गुण, इयत्ता दहावीतील अंतर्गत मूल्यमापन तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षांच्या गृहपाठाच्या आधारावर ५० टक्के गुण, अशा एकत्र गुणांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून दहाव्या वर्गाचा निकाल लावण्याचे नियोजन शासनाने केले आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर या निकालाची आणि परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे. मात्र, नागपूर आणि अमरावती शिक्षण मंडळाच्या कार्यालयात अनेक वर्षांपासून पूर्णकालीन अध्यक्ष व सचिव  नाही.  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि मूल्यांकनावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप महाराष्ट्र शिक्षण परिषदेने केला आहे.  नागपूर विभागाच्या अध्यक्षपदाचा प्रभार तत्कालीन अध्यक्ष चंद्रमणी बोरकर यांच्याकडे होता. त्यांची पदोन्नती झाल्यानंतर संजय गणोरकर हे प्रभारी होते. त्यानंतर अनिल पारधी,  रविकांत देशपांडे हे प्रभारी होते. त्यानंतर पुन्हा अनिल पारधी  प्रभारी झाले आणि आता हा कार्यभार नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्याकडे  आहे.

All the Chief Executive Officers of the Zilla Parishad were given instructions regarding the recruitment of teachers Pune print news
शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया कधीपासून? शिक्षण विभागाने काय सांगितले?
mumbai university, xerox center, new exam building, kalina,
मुंबई : नवीन परीक्षा भवनात छायांकित प्रत केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ
Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम

त्याचप्रमाणे सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार हा माधुरी सावरकर यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. ही पदे पूर्णकालीन नियुक्तीने अद्यापही भरण्यात आलेली नाहीत. त्याचप्रमाणे अमरावती विभागामध्ये संजय गणोरकर पूर्णकालीन नियुक्त अध्यक्ष होते. त्यानंतर महेश करजगावकर प्रभारी अध्यक्ष, संजय यादगिरे हेसुद्धा प्रभारी अध्यक्ष होते. आता मात्र, शरद गोसावी हे नियमित अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत, त्याचप्रमाणे सचिव पदावर प्रदीप अभ्यंकर हे नियमित सचिव

होते, त्यानंतर अनिल पारधी हे सचिव पदावर होते आणि आता अमरावती जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्याकडे अमरावती विभागाच्या शिक्षण सचिव म्हणून प्रभार सोपवण्यात आला आहे.

अमरावती व नागपूर विभाग हा विस्ताराने मोठा असल्यामुळे या दोन्ही विभागातील अध्यक्ष आणि सचिवपदे नियमित रूपाने पूर्ण कालीन पद्धतीने भरण्यात यावी. – योगेश बन, विभाग कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर विभाग.