Premium

मराठा आरक्षण क्रांती मोर्चा : बुलढाणा जिल्हा, आयोजकांसह इतर भागांतही उत्सुकता!

मराठा आरक्षण व जालना लाठीमारच्या निषेधार्थ बुलढाणा शहरात आज, बुधवारी मध्यान्ही निघणारा मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. यानिमित्त सात वर्षांपूर्वी बुलढाण्यात निघालेल्या ऐतिहासिक मोर्च्याचे स्मरण सर्वांनाच होणार आहे.

Marathi Kranti Morcha Buldhana
सात वर्षांपूर्वी 13 सप्टेंबर 2016 रोजी बुलढाण्यात काढण्यात आलेल्या मोर्च्याचे ड्रोन फोटो (संग्रहित छायाचित्र)

बुलढाणा : मराठा आरक्षण व जालना लाठीमारच्या निषेधार्थ बुलढाणा शहरात आज, बुधवारी मध्यान्ही निघणारा मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. यानिमित्त सात वर्षांपूर्वी बुलढाण्यात निघालेल्या ऐतिहासिक मोर्च्याचे स्मरण सर्वांनाच होणार आहे. आजचा मोर्चा त्या मोर्च्याची बरोबरी करणार की त्यापेक्षा वरचढ ठरणार, अशी चर्चा यानिमित्त रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील शिस्तबद्ध मोर्च्याचा अनुभव पाठीशी असल्याने पोलीस विभाग फारसा तणावात नसल्याचे चित्र आहे. मागील १३ सप्टेंबर २०१६ रोजी काढण्यात आलेला मोर्चा संख्या, शिस्त, संयम, अनुशासन, नियोजन या सर्वच बाबतीत अभूतपूर्व ठरला होता. या पार्श्वभूमीवर आजचा मोर्चा कसा निघणार, मागची बरोबरी करणारा की वरचढ ठरणार? अशी व्यापक उत्सुकता पोलीस, जिल्हावासीयांसह आयोजकांनाही आहे.

हेही वाचा – “यशोमती ठाकूर भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या,” आमदार रवी राणा यांचा दावा, म्हणाले…

हेही वाचा – राज्यात पावसाचा जोर वाढणार, १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान अंदाज

असे आहे नियोजन

जिल्ह्याभरातून आलेले सकल मराठा समाज बांधव बुधवारी सकाळी बुलढाण्यातील जयस्तंभ चौक परिसरातील जिजामाता व्यापार व क्रीडा संकुल येथे जमा होणार आहे. संगम चौकातील नियोजित शिवस्मारक शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येईल. यानंतर जयस्तंभ चौक ते लालाजी आईस्क्रीम, स्टेट बँक चौक ते जयस्तंभ असा मार्ग राहणार आहे. जयस्तंभ चौकात महाविद्यालयीन युवती मोर्चाला संबोधित करतील. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर जिजाऊ वंदनाने मोर्च्याची सांगता होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi kranti morcha today in buldhana scm 61 ssb

First published on: 13-09-2023 at 09:44 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा