लोकसत्ता टीम

नागपूर: आयकर विभाग, नागपूरने विदर्भ आणि नाशिक विभागासाठी लोकसभा निवडणुकीत बेकायदेशीरपणे रोख रक्कम, मौल्यवान वस्तूंचे वाटप केले जात असेल तर याबाबत माहिती देण्यासाठी किंवा तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तेथे नागरिक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा फोन , व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे माहिती देऊ शकतात.

Watch out for suspicious financial transactions in elections Expenditure Inspector advises
निवडणुकीत संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवा, खर्च निरीक्षकांची सूचना
vehicles, Palghar,
पालघर लोकसभा निवडणुकीसाठी साडेआठशेहून अधिक वाहने, परिवहन विभागाकडून तपासणी सुरू
Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
Lok Sabha Election 2024 Phase 1 Live Updates in Marathi
Lok Sabha Election 2024 Phase 1 : विदर्भात ५ जागांसाठी आज मतदान; नक्षलग्रस्त, संवेदनशील भागांत चोख सुरक्षा व्यवस्था

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया संपूर्ण भारतात सुरू झाली आहे. याच दृष्टीने आयकर विभाग, नागपूरने विदर्भ आणि नाशिक विभागासाठी लोकसभा निवडणुकीत बेकायदेशीरपणे रोख, मौल्यवान वस्तूचे वाटप किंवा वापर होत असेल तर यासंबंधीची माहिती, तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्ष दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस (२४x७) कार्यरत असेल.

आणखी वाचा- मृतदेहाची अवहेलना! रस्त्यावरच दहन, गावात तणाव; जाणून घ्या सविस्तर…

नागरिक त्यांच्या तक्रारी टोल फ्री क्रमांक : 1800-233-0355, टोल फ्री क्रमांक : १८००-२३३-०३५६, व्हॉट्सॲप क्रमांक : 9403390980 यावरनोंदवू शकतात, असे आयकर विभागाने कळविले आहे