नागपूर : युवकाने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका नऊ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. कुणालाही सांगितल्यास आई बाबांना ठार मारण्याची धमकी दिली. ही संतापजनक घटना काचीपुऱ्यात घडली. या प्रकरणी तक्रारीवरून आरोपी दिनेश किल्लारे (३०) रा. काचिपुरा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.

आरोपी दिनेश कल्लारे हा मूळचा बालाघाट, मध्यप्रदेशातील असून मागील सहा महिन्यांपापून नागपुरात राहात आहे. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले. मात्र, पत्नी सोडून गेल्यानंतर तो नागपुरात आला. काचिपुऱ्यातील एका फरसानच्या दुकानात काम करीत होता. दुकान मालकाने जवळच त्याची राहण्याची व्यवस्था केली. दुकानात दिनेशसह तिघे जण काम करतात. त्यापैकी दिनेश हा नेहमीच दुकानात असायचा. घटनेच्या वेळी म्हणजे रविवार २८ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास दिनेश दुकानात होता. फिर्यादीची ९ वर्षाची मुलगी परिसरात खेळत होती. दिनेशने तिला बोलाविले. चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिला खोलीत नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने आरडाओरड केली.“कुणाला काही सांगायचे नाही, अन्यथा तुझ्या आई बाबांचा खून करेल’ अशी धमकी दिली. पीडित चिमुकली घरी गेली. काही वेळानंतर तिने सारा प्रकार आईला सांगितला. फिर्यादीने बजाजनगर पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपी विरूध्द विविध कलमान्यवे गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

Aarti Yadav sister accuses the police on a murder complaint vasai
हत्येपूर्वी तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही;  मयत आरती यादवच्या बहिणीचा पोलिसांवर आरोप
man suicide after Sexual Assault
चार व्यक्तींकडून २३ वर्षीय युवकावर लैंगिक अत्याचार; पीडित युवकाची आत्महत्या
Abandoned infants found by the side of the road A case has been registered against an unknown person Mumbai
रस्त्याच्या कडेला सापडले बेवारस अर्भक; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Yuvraj Goyal
भारतीय तरुणाची कॅनडात गोळ्या झाडून हत्या, पोलिसांनी चार संशयितांना घेतलं ताब्यात!
father arrested for raping two minor daughter in nagpur
संतापजनक! नराधम बापाचा स्वत:च्याच दोन मुलींवर शारीरिक अत्याचार
pune porsche accident
Pune Accident : अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबांच्या कोठडीत वाढ, पुणे जिल्हा न्यायलयाचा निर्णय
Pune accident bribe
Pune Accident : रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यासाठी लाखो रुपयांची लाच? ससूनच्या कर्मचाऱ्याकडून रोख रक्कम जप्त
minors Both blood samples revealed no alcohol
अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या दोन्ही नमुन्यांत मद्यांश नसल्याचे उघड, रक्ताचे नमुने घेण्यास विलंब?

दरम्यान, असाच प्रकार आरोपीने एका सात वर्षाच्या मुलीसोबत केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे आणखी मुलींशी असाच प्रकार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.