नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपिक-टंकलेखक परीक्षेचा घोळ अखेर संपला आहे.आयोगाने यासंदर्भात सविस्तर उत्तर सादर करत उमेदवारांना दिलासा दिला आहे. यामुळे आता मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांचे टंकलेखन प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांवर कारवाईचा इशाराही आयोगाने दिला. डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला. लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी अखेर प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गुरुवारी निकाल जाहीर केला.

‘एमपीएससी’ने गट-क संवर्गातील ७ हजार ५१० पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेतली होती. मात्र मुख्य परीक्षा होऊन चार महिन्यानंतरही निकाल घोषित झाला नव्हता. उमेदवार अक्षरशः हवालदील झाले होते. अखेरीस गुरुवारी आयोगाने कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी घोषित करत मोठा दिलासा दिला.

हेही वाचा >>>लहानपणी कचऱ्यात सापडलेल्‍या मुलीची गगनभरारी; अनाथ-अंध मालाचे एमपीएससीत यश

आयोगाच्या शुद्धीपत्रानुसार, टंकलेखन चाचणी संदर्भातील प्रश्न एकचे उत्तर नमूद केले आहे; पण प्रश्न दोनचे उत्तरच नमूद केले नाही किंवा विसंगत उत्तर दिले आहे. अशा विद्यार्थ्यांची टंकलेखन चाचणी कोणत्या भाषेत होईल. :प्रश्न क्रमांक एकच्या उत्तरानुसार त्याच्याकडे ज्या भाषेचे प्रमाणपत्र आहे. त्याच भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी होईल. प्रश्न एकमध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्ही प्रमाणपत्र असल्याचे पर्याय निवडले आहेत. :मराठी भाषेची टंकलेखन कौशल्य चाचणी होईल. उमेदवाराने टंकलेखन चाचणी संदर्भातील कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

हेही वाचा >>>दर घसरले! दहा लाखाची संत्री अडीच लाखात; शेतकऱ्याने सहा एकरातील संत्रा जेसीबी…

 उमेदवाराची शैक्षणिक अर्हता तपासून त्याच्याकडे ज्या भाषेचे प्रमाणपत्र आहे त्या भाषेची टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.  यापूर्वी एमपीएससीमध्ये असाच प्रकार समोर आला होता. महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ कर सहाय्यक या पदाचा कौशल्य चाचणीसाठीचा निकाल प्रसिद्ध केला. त्यात कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र नसताना काही उमेदवार पात्र ठरविण्यात आले होते. कर सहाय्यक पदासाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहेत. तरीही एक प्रमाणपत्र असलेल्यांना पात्र ठरविण्यात आले आहेत. तसेच एकही टंकलेखन प्रमाणपत्र नसणारे,  प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त ,पदवीधर, अंशकालीन उमेदवार, माजी सैनिक कर सहायक साठी पात्र केले गेले आहेत. पण हे आरक्षण लिपिक व टंकलेखकांसाठी आहे. ते कर सहाय्यक पदासाठी लागू नाही. म्हणून ते अपात्र असायला हवेत अशी मागणी केली होती.