अमरावती : शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीवर भरपूर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्‍यक्‍तीची तब्बल ८४ लाख ७९ हजार ४३६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील पंचवटी कॉलनी येथील रहिवासी मोहन उत्तमराव गोहत्रे यांच्याशी एका सायबर लुटारूने समाजमाध्‍यमाद्वारे संपर्क साधला. शेअर मार्केट समूहाशी जुळण्‍याचा सल्ला दिला. शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरपूर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून इंदिरा-सेस हे ॲप डाऊनलोड करायला सांगितले. मोहन गोहत्रे यांनी आमिषाला बळी पडून सदर ॲप डाऊनलोड केल्यावर सायबर लुटारूने त्यांना विविध बँक खात्यांमध्ये रक्कम पाठवायला भाग पाडले. अशा प्रकारे त्यांची तब्बल ८४ लाख ७९ हजार ४३६ रुपयांनी ऑनलाइन फसवणूक केली.

हेही वाचा – VIDEO : तीन महिन्यांच्या बछड्यांसह वाघिणीचा ‘रॅम्प वॉक’, एकदा बघाच….

हेही वाचा – लोणार सरोवराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळणार

खोट्या शेअर बाजारात गुंतवणूक करायला लावून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मोहन गोहत्रे यांनी सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online fraud with a person by pretending to make profit in the stock market mma 73 ssb
First published on: 24-01-2024 at 18:10 IST