Premium

शिंदे सरकार ६२ हजार सरकारी शाळा खासगी कंपन्यांना देणार, बाह्ययंत्रणेकडून कंत्राटी भरतीनंतर आता शिक्षणाचेही खासगीकरण

बाह्ययंत्रणेकडून कंत्राटी भरतीच्या निर्णयानंतर आता सरकारी शाळा खासगी कंपनीच्या दावणीला बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

government schools in maharashtra
शिंदे सरकार ६२ हजार सरकारी शाळा खासगी कंपन्यांना देणार, बाह्ययंत्रणेकडून कंत्राटी भरतीनंतर आता शिक्षणाचेही खासगीकरण (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

नागपूर : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. बाह्ययंत्रणेकडून कंत्राटी भरतीच्या निर्णयानंतर आता सरकारी शाळा खासगी कंपनीच्या दावणीला बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सरकारी शाळांचा पायाभूत विकास व्हावा यासाठी या शाळा सुरुवातीला दहा वर्षांसाठी कार्पोरेट उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था आदींना दत्तक दिल्या जातील. या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी त्यांच्याकडील सीएसआर निधीचा वापर करता येईल, तसेच या समूहांना आपल्या आवडीच्या नावाप्रमाणे शाळांच्या नावापुढे आपले नावेही देता येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा – हे जातचोर आता फिरताहेत, खोटे आरोप करताहेत…; आमदार यशोमती ठाकूर यांची राणा दाम्‍पत्‍यावर टीका

राज्यात ६२ हजार सरकारी शाळा आहेत. या शाळा दत्तक देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सकारात्मक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. शासकीय कायमस्वरुपी नोकरीच्या आशेने राज्यातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना राज्य शासनाने विकासकामांना पुरेसा निधी मिळावा व प्रशासकीय खर्चात काटकसर करण्यासाठी रिक्त जागांवर बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिग) माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांचा राजीनामा एकमताने मंजूर

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाअंतर्गत १३८ पदांच्या भरतीसाठी नऊ बाह्य सेवापुरवठादार संस्थांच्या कंत्राटदारांना मान्यता देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच आता शाळा खासगी कंपनी चालवणार असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shinde government will give 62 thousand government schools in maharashtra to private companies dag 87 ssb

First published on: 13-09-2023 at 10:24 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा