राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा ५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. अशात विद्यापीठाच्या एका प्राध्यापिकेने परिक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा- “चैत्यभूमीवरील गर्दी रोखण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे…”; बसपाचा केंद्र सरकारवर आरोप

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

प्राध्यापकांना प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या केंद्रावर भ्रमणध्वनी नेण्यास बंदी नसते. विद्यापीठ एका विषयाच्या तीन प्रश्नपत्रिका तयार यातून एक प्रश्नपत्रिका छपाईला पाठवली जाते. मात्र, यातही प्रचंड गोपनीयता बाळगली जाते. असे असले तरी प्रश्नपत्रिका तयार करताच प्राध्यापक आपल्या मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचा फोटाे काढून तो विद्यार्थ्यांच्या व्हॉट्अॲप ग्रुपवर व्हायरल करतात. असाच काहीसा प्रकार एका प्राध्यापिकेने केला. प्रश्नपत्रिका तयार होताच सायंकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांना पाठवण्यात आली. ही प्रश्नपत्रिका बी.एस्सी.च्या तिसऱ्या सत्राच्या भौतिकशास्त्राची आहे. पेपर तयार करणाऱ्या प्राध्यापकानेच व्हॉट्सॲपवर पेपर पाठवल्याने विद्यापीठात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धती आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हे पहिलेच प्रकरण आहे की, यापूर्वीही अशाच प्रकारे पेपर फुटले होते, असे प्रश्नही आता उपस्थित केले जात आहेत. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेत कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.