Premium

टोलमुळे शासनाला महसुलाची ‘समृद्धी’! महामार्गावर ४२२ कोटी ९ लाख रुपये वसूल

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या महामार्गावरून डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५४ लक्ष ५४ हजार ८६२ वाहने धावली.

Samruddhi Highway
टोलमुळे शासनाला महसुलाची 'समृद्धी'! महामार्गावर ४२२ कोटी ९ लाख रुपये वसूल (image – mahasamruddhimahamarg.com)

वाशिम : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या महामार्गावरून डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५४ लक्ष ५४ हजार ८६२ वाहने धावली. या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लक्ष ७९ हजार ३९९ रुपयांचा टोल महसूल जमा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर नागपूर ते मुंबई, शिर्डी, नाशिक व इतर शहरांमधील अंतर कमी झाले. हळू हळू या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली. मात्र वाढत्या अपघातांमुळे रस्त्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. ३० नोव्हेंबरपर्यंत या मार्गावर विविध गंभीर प्रकारचे ७३ अपघात होऊन या अपघातात १४२ जणांना आपले प्राण गमावले लागले. तर ४ डिसेंबर २०२३ पर्यंत १ हजार ४८९ अपघात झाले. या महामार्गावरून डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५४ लक्ष ५४ हजार ८६२ वाहने धावली आहेत. या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लक्ष ७९ हजार ३९९ रुपये टोल महसूल वसूल झाल्याची माहिती सुरोसे यांनी दिली.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांनो सतर्क रहा; ‘या’ एक्सप्रेसच्या मार्गात बदल

हेही वाचा – चंद्रपूरमध्ये उष्ण लहरी कमी मात्र पावसाळा, अति पाऊस वाढणार, संशोधन संस्थेचा अभ्यास अहवाल

समृद्धी महामार्गावर विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लेन शिस्त न पाळणे, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे, वाहन अवैध ठिकाणी पार्किंग करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहन सुरक्षित न ठेवणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्ट न वापरणे आणि वाहन चालक सतर्क नसणे ही प्रमुख कारणे समृद्धी महामार्गावरील अपघातास कारणीभूत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Toll of 422 crores 9 lakhs collected on samruddhi highway pbk 85 ssb

First published on: 08-12-2023 at 10:44 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा