नागपूर : महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये अनाधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या सहा विक्रेत्यांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली तर दोन विक्रेते पळ काढण्यात यशस्वी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर रेल्वे स्थानकावरून बिर्याणी घेतलेल्या काही प्रवाशांना विषबाधा झाली होती. रेल्वे प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने खाद्यपदार्थांची तपासणी तसेच विक्रेत्याबाबत कडक कारवाईस सुरूवात केली आहे. महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये तपासणी दरम्यान आठ अवैध खाद्यपदार्थ विक्रेत आढळून आले.

हेही वाचा – नागपूर : झोमॅटो बॉयला चाकूच्या धाकावर लुटले…

हेही वाचा – गडचिरोली : क्रिकेटवर ‘ऑनलाईन’ जुगार; आणखी दोघांवर गुन्हा

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या प्रतिनिधी आणि कॅटरिंग इन्स्पेक्टर यांनी कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये तपासणी केली. ही गाडी बडनेरा-नागपूर दरम्यान असताना काही विक्रेते खाद्यपदार्थ विकत असल्याचे दिसून आले. त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगण्यात आले. त्यांच्याकडे आयआरसीटीसीने उपलब्ध करून दिलेले ओळखपत्र नव्हते. मात्र, हे आठही विक्रेते स्वतःला आर अँड के असोसिएट्सचे सहयोगी असल्याचे सांगत होते. कागदपत्रांची कसून पडताळणी केल्यावर कोणाकडेही आयआरसीटीसीने दिलेले ओळखपत्र नसल्याचे उघड झाले. नागपूर स्थानकावर रेल्वे संरक्षण दलाच्या सहाय्याने आठपैकी सहा विक्रेत्यांना पकडण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorized sale of food in maharashtra express six sellers arrested rbt 74 ssb