नागपूर: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने सहाय्यक संचालक आणि इतर अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : रब्बी हंगामातील हमीभाव, NCERT च्या पुस्तकांवरून भारत-इंडिया वाद अन् भारताच्या माजी नौसैनिकांना कतारमध्ये फाशीची शिक्षा, वाचा…

The Hindustan Urvarak And Rasayan Limited Apply Online for 80 Various Posts Vacancies Check all the detailed
HURL Recruitment 2024 : एचयूआरएल अंतर्गत ‘या’ पदांसाठी होणार भरती; महिना १६ लाख पगार; जाणून घ्या शेवटची तारीख
upsc capf recruitment 2024 registration begins apply for 506 assistant commandant
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, पगार आणि अर्जाची प्रक्रिया
Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार

असिस्टंट डायरेक्टरसह अनेक पदांवर भरती

या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया २८ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली असून इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करा. इच्छुक उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. या भरतीअंतर्गत ४६ पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर आहे. या भरतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना पदानुसार वेतनस्तर १० ते वेतन स्तर १३ पर्यंत वेतन मिळेल. या भरतीसाठीची निवड परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड भरती चाचणी आणि मुलाखतीद्वारे भरतीमध्ये पात्र ठरण्यासाठी उमेदवाराने मुलाखतीच्या टप्प्यावर श्रेणीतील योग्यतेची किमान पातळी गाठणे आवश्यक आहे.

स्पेशलिस्ट ग्रेड  : ७ पदे

सहाय्यक संचालक : ३९ पदे

प्राध्यापक : १ पद वरिष्ठ व्याख्याता (सीनियर लेक्चरर) : ३ पदे