वाशिम : हुंड्यापोटी महिलांचा अनन्वित छळ सुरूच आहे. चारचाकी गाडी घेण्यासाठी नवविवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करून तीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना वाशिम तालुक्यातील वाघजाली येथे घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण पोलिसात गजानन घुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची भाची मेघा हिचा विवाह वाघजाली येथील गजानन बबन शिंदे यांच्याशी १ जुन २०२३ रोजी झाला होता. पती, सासू सासरे हे चारचाकी वाहन घेण्याकरिता विवाहितेच्या वडिलांकडे पाच लाख रुपयांची मागणी करीत होते. यावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. त्यानंतर दिवाळीपूर्वी दोन लाखांचा चेक व पन्नास हजार रुपये दिले. मात्र त्यानंतर देखील मुलीचा छळ सुरूच होता. अखेर २७ जानेवारी रोजी राहत्या घरात धारदार शस्त्राने मेघाचा गळा चिरून खून केल्याची फिर्याद वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

हेही वाचा – नागपूर : महामार्गावर निष्काळजीपणे उभे केलेल्या ट्रकांना धडकून दोन ठार

हेही वाचा – थंडीच्या कडाक्यातून राज्याची सुटका नाही, किमान तापमानात होणार घट

या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून हुंड्यापोटी अजून किती महिलांचा बळी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिता इंगळे या करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman murder for four wheeler vehicle incidents in washim taluka pbk 85 ssb
First published on: 28-01-2024 at 14:31 IST