शहरात वाहन जाळपोळीचे सत्र सुरूच असून शुक्रवारी रात्री पेठ रस्त्यावरील हमालवाडी भागात संशयितांनी मालवाहू अ‍ॅपेरिक्षा जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. संशयितांनी दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पंचवटीतील दत्तनगरजवळ असलेल्या हमालवाडी हाऊसिंग सोसायटीत संजय जाधव वास्तव्यास आहेत. त्यांची ही अ‍ॅपेरिक्षा आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे जाधव यांनी आपली अ‍ॅपेरिक्षा घराजवळ उभी केली. रात्री जेवण झाल्यावर जाधव कुटुंबीय झोपी गेले. रात्री दीड ते दोनच्या सुमारास तीन संशयित या परिसरात दाखल झाले. त्यांनी जाधव यांच्या रिक्षाचे मागील टायर प्लास्टिक गोणीने आच्छादून पेटवले. दरम्यान, जाधव यांना रिक्षाशी कोणी खेळत असल्याचा संशय आल्याने त्यांनी घराबाहेर डोकावले असता मागील टायर जळताना दिसले. त्यांनी लगेच घराबाहेर धाव घेतली. पाणी ओतून आग विझवली.
हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. रिक्षाचे एक हजार रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta vyaktivedh Vitthal Shanbhag Ranichi Bagh at Byculla Mumbai Jijamata Park
व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग
Arunachal Pradesh Manipur girls trafficked in Nagpur Ginger Mall in the name of spa crime news
‘स्पा’च्या नावावर सेक्स रॅकेट; नागपूरच्या जिंजर मॉलमध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूरच्या तरुणींकडून देहव्यापार
Mahavitaran Employee, Fatally Attacked, High Electricity Bill, Inquiry, murder in pune, murder in baramati, Mahavitaran Employee attacked, Mahavitaran Employee murder, barmati news, marathi news, pune news, mahavitaran news, police,
बारामती : महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याचा कोयत्याने १६ वार करून खून, विजेचे बिल जास्त आल्याने ग्राहकाकडून हल्ला
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया