तलाठी सजांची व महसूल मंडलाची पुनर्रचना करावी, तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजाचे योग्य प्रशिक्षण द्यावे आदी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी मंगळवारपासून संपावर गेल्यामुळे शेती व जमिनीशी संबंधित सातबारा नोंदी आणि शैक्षणिक दाखले मिळविण्याचे काम ठप्प झाले.
मागील आठवडय़ात तलाठी, मंडल अधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला होता. जिल्हा प्रशासनास बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला. मात्र प्रशासनाने त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. मंगळवारपासून नाशिक जिल्ह्य़ातील तलाठी व मंडल अधिकारी असे एकूण ५३६ अधिकारी मंगळवारपासून संपात सहभागी झाले. सातबारा संगणकीकरण, ई-फेरफारसंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत जमाबंदी आयुक्तांना वेळोवेळी कल्पना दिली गेली. संगणकीय प्रणालीतील तांत्रिक दोषाकडे लक्ष वेधले. तसेच अवैध गौण खनिज वसुली कामातून तलाठी संवर्गास वगळावे, तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय बांधून द्यावे, २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांनी राखून ठेवावी आदी मागण्या केल्या. महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, अंशदायी निवृत्ती योजना आदींबाबत महसूलमंत्र्यांनी आश्वासन देऊनही त्याची पूर्तता झाली नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. शासनाकडून मागण्यांची पूर्तता केली जात नसताना दुसरीकडे कामाचा अतिरिक्त ताण वाढवला जात आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र शेतकऱ्यांची आबाळ होऊ नये यासाठी ज्या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो व गुरांच्या छावण्या आहेत तेथील तलाठी संपावर राहूनदेखील टँकरवर देखरेख व छावणी तपासणीचे काम करतील. संघटना चर्चेसाठी तयार आहे. शासनाने हा विषय प्रतिष्ठेचा न करता मागण्या सोडवाव्यात.
मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संप सुरू राहणार असल्याचे तलाठी संघटनेचे अध्यक्ष निळकंठ उगले यांनी सांगितले. दरम्यान, दाखले मिळवण्याची प्रक्रिया संगणकीय झाली असली तरी तलाठी संपावर गेल्यामुळे जून महिन्यात पावसाच्या सुरुवातीस होणाऱ्या खरीप हंगामासाठी लागणारे कर्ज, त्यासाठी आवश्यक सातबारा, जमिनीवर बोजा याचा तपशिलासह अन्य काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळवण्यात अडचणी येणार आहेत. विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक दाखले मिळविण्याच्या अडचणींना तोंड द्यावे लागेल, अशी चिन्हे आहेत.

 

snake found in district officer office Alibaug
बापरे बाप, जिल्हाधिकारी कार्यालयात शिरला भला मोठा साप…..
रायगड जिल्ह्यातील १३ मंडळ अधिकाऱ्यांवर शिस्तीसाठी कार्यवाही
रायगड जिल्ह्यातील १३ मंडळ अधिकाऱ्यांवर शिस्तीसाठी कार्यवाही
dhule, Zp School, Headmaster, Disciplinary Action, Education Department, Failing to give answers, students,
धुळे : अधिकाऱ्यांच्या तोंडी परीक्षेत मुख्याध्यापकच नापास, मग…
tribal farmers protest in nashik,
नाशिक: आदिवासी शेतकरी आंदोलनातील एकाचा मृत्यू; जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव