नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेचे उपसभापती तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ हे उपस्थित राहिल्याने महायुतीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी शरद पवार गटाचा प्रचार करीत असल्याचा आरोप याआधीच केला होता. त्यास या उपस्थितीने एकप्रकारे दुजोरा मिळाल्याने झिरवळ हे पुन्हा शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नाशिकप्रमाणे दिंडोरी मतदारसंघात महायुतीत धुसफूस सुरू आहे. या जागेवर भाजपच्या डॉ. भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात लढत आहे. भगरे यांच्या प्रचारार्थ तिसगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी गावातील मंदिराच्या कामाचा शुभारंभ होणार होता. शरद पवार गटाची बैठक सुरू असताना झिरवळ हे अकस्मात दाखल झाले. बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेट्ये यांनी झिरवळ हे मंदिराच्या कामासाठी आले होते, योगायोगाने ते बैठकीत सहभागी झाल्याचे नमूद केले. झिरवळ या बैठकीत सहभागी झाल्याची माहिती छायाचित्रांमधून सर्वत्र पसरल्यानंतर महायुतीच्या गोटात खळबळ उडाली. खुद्द झिरवळ हे देखील संपर्क क्षेत्राबाहेर गेले. दिवसभर त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
Raj Thackeray Fatwa
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
nashik, shantigiri maharaj, nashik lok sabha seat, shantigiri maharaj meet chhagan Bhujbal, shantigiri maharaj respond cm Eknath shinde, lok saha 2024, nashik news, marathi news,
राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, शांतिगिरी महाराजांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”

हेही वाचा…धुळे जिल्ह्यात पोलीस वाहन, रुग्णवाहिकेवर दगडफेक करणाऱ्या जमावाविरुध्द गुन्हा

झिरवळ यांच्या कार्यपध्दतीने अजित पवार गटाची कोंडी झाली. छगन भुजबळ यांनी झिरवळ हे असे काही करतील, असे वाटत नसल्याचे सांगितले. भगरे आणि झिरवळ हे दोघे दिंडोरी या एकाच भागातील आहेत. संबंधामुळे कदाचित ते गेले असतील, परंतु, त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये. आपल्याकडे अनेक उमेदवार भेटायला येतात, असा दाखला भुजबळ यांनी दिला. झिरवळ हे मुलगा गोकुळ याच्यासाठी शरद पवार गटाकडून लोकसभेच्या तिकीटासाठी इच्छुक होते. त्या अनुषंगाने गोकुळ झिरवळ यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. परंतु, तिकीट नाकारण्यात आले होते.