भौगोलिक.. सांस्कृतिक.. शैक्षणिक. भिन्नता असली तरी ‘चारचौघांसारखा संसार’ हे प्रत्येकाचे स्वप्न असते. असेच स्वप्न मनात ठेवून अमेरिका येथील दाम्पत्य नाशिक येथील आधाराश्रमात आले. ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेल्या ‘कारा’च्या अंतर्गत आश्रमातील ‘जाई व जुई’ या दोन कळ्या सोबत घेत त्यांनी आपली संसारवेल फुलवली. सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत दत्तकविधान सोहळा पार पडल्यानंतर आमचे स्वप्न प्रत्यक्षात आल्याचे सांगत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

आधाराश्रमातून केंद्र सरकारने ऑनलाइन पद्धतीने सुरू केलेल्या ‘कारा’ प्रणालींतर्गत आजवर १२ बालके परदेशात दत्तक गेली आहेत. दत्तक प्रक्रियेचे वैशिष्टय़ म्हणजे, या बाराही बालकांना सिकलसेल, कर्णबधिरत्व, हृदयरोग यासह अन्य काही आजार होते. परदेशस्थित दाम्पत्यांनी या बालकांचा देवाची देन असल्याचे सांगत त्यांचा हसत स्वीकार केला.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!

हिडजर यांना स्वतची मुलगी आहे. दुसऱ्या वेळी बाळ व्हावे, यासाठी प्रयत्न करत असताना गर्भपातासह अन्य काही शारीरिक व्याधींचा त्रास सुरू झाला. याचा परिणाम येणाऱ्या बालकावर झाला असता. हे टाळण्यासाठी त्यांनी दुसरे मूल दत्तक घेण्याचे निश्चित करताना मुलीला प्राधान्य दिले. त्यानुसार माहिती मिळवताना ‘जाई-जुई’चा चेहरा समोर आला. सर्व काही जुळून आले आणि आज माझ्या मुली माझ्या हातात आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सारा यांनी आई व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, आपले ते पूर्ण झाले. पण या त्रिकोणी संसारात चौथा पाहुणा आम्हाला हवा होता. पण ते शक्य नसल्याने बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. आमचे काही नातेवाईक काही वर्षांपूर्वी भारतात आले होते. त्यांना येथील संस्कृती आवडली. यामुळे भारतातून बाळ दत्तक घ्यायचे आम्ही ठरवले. या चिमुकल्यांना पाहून आमचे जुने काही संबंध असल्याची आंतरिक भावना आहे, जी शब्दात व्यक्त करणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हिडजर दाम्पत्य शनिवारी नाशिक येथे आले. आश्रमात आल्यावर आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करत त्यांनी दोघींना सोबत घेतले. शहरातील एका हॉटेलमध्ये गेली दोन दिवस ते चिमुकल्यांसमवेत वास्तव्यास होते. या सहवासात दोघांचा या बालकांना आणि बालकांचा त्यांना लळा लागला असल्याचे आधाराश्रमाचे समन्वयक राहुल जाधव यांनी सांगितले.

सोमवारी संस्थेचे पदाधिकारी व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांच्या उपस्थितीत दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सारा यांच्याशी आई म्हणून संवाद साधताना बाळांनी पुढे काय व्हावे असे वाटते, या प्रश्नावर त्यांनी या दोघींनी भारतीय वंशाच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष झाल्याचे अधिक भावेल असे उत्तर दिले.

जाई-जुईला जन्मत: हृदयाचा त्रास

सोमवारी आश्रमातील नऊ महिन्यांच्या जाई-जुई या जुळ्या मुलींचा दत्तक विधान सोहळा पार पडला. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील व्यावसायिक ख्रिस्तोफर मायकल हिडजर व पत्नी सारा यांनी ‘जाई-जुई’चा हसतमुखाने स्वीकार केला. जाई-जुईला जन्मत: हृदयाचा त्रास असून एकीवर शस्त्रक्रियेची गरज आहे. तसेच त्यांना सिकलसेल आजाराचाही त्रास आहे. मात्र त्यांच्यातील वैगुण्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने आपले संसाराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे हिडजर यांनी सांगितले.