नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन रविवारी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात होणार आहे. यानिमित्त शतक महोत्सवाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली.

संस्थेने १०० वर्षांची वाटचाल पूर्ण केली असून या वाटचालीत ठळक टप्पे सर्वासमोर यावेत, यासाठी शतक महोसवाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर यांनी दिली. या वेळी सचिव महेश दाबक, ज्ञानेश्वर कुलकर्णी, डॉ. सुनील कुटे आदी उपस्थित होते.

Shivsena Thackeray group,
उपमुख्यमंत्र्यांना सभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून पनवेलकरांच्यावतीने पाच प्रश्न
thane lok sabha campaign marathi news, ubt shivsena rajan vichare marathi news
मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघावर ठाकरे गटाने केले लक्ष केंद्रीत, राजन विचारेंच्या प्रचार यात्रेची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपखाडीतून
Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?

पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधील नव्या सभागृहाचे नामकरण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल. कार्यक्रमस्थळी संस्थेच्या १०० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणारे खास प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. शतक महोत्सवी वर्ष साजरे करताना विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता वेगवेगळ्या समिती गठीत करीत माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. आतापर्यंत २५ हजार माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत.

‘संचित शतकाचे, स्वप्न उज्ज्वल भविष्याचे’ या संकल्पनेवर शतक महोत्सवाची आखणी करण्यात आल्याचे महेश दाबक यांनी सांगितले. संस्थापक सदस्य शि. रा. कळवणकर, शि. अ. अध्यापक, ल. पां. सोमण, रं. कृ. यार्दी, वा. वि. पाराशरे यांनी एकत्रित येत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेने वाटचालीत अनेक खाचखळगे पार केले. कविवर्य कुसुमाग्रज, माधव मनोहर, प्रभाकर अत्रे, ग. वि. अकोलकर, अरविंद वर्टी, दत्ता भट, ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक, बापू नाडकर्णी, शिवाजी तुपे, भाऊसाहेब हिरे, शेतकरी संघटनेचे शरद जोशी, नीला सत्यनारायण, अभिनेत्री सायली संजीव या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याची माहिती या वेळी देण्यात आली. संस्थेचे ४८ वेगवेगळे विभाग असून संस्थेला शिक्षण क्षेत्रातील मानाचा असलेला ‘कम्प्युटर लिटरसी एक्सलन्स अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे.

याशिवाय संस्थेच्या वतीने रात्रशाळा सुरू आहे.  या सोहळ्यास नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

शतक महोत्सवी कार्यक्रम

महोत्सवात सूर्यनमस्कार एक आविष्कार- एक कोटी सूर्यनमस्कार, १०० वर्ष पूर्ण केलेल्या संस्थांचे एकत्रीकरण व संस्था प्रतिनिधींचा मेळावा, बाल साहित्य संमेलन, संकुलस्तरावर करिअर फेअर, संगीत रजनी, इंग्लिश कोर्स, राज्यस्तरावर वा. श्री. पुरोहित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, क्रीडा महोत्सव, अनुभूती विज्ञानाची-संकल्प १५० वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन, पर्यावरण विषयक १०० पथनाटय़ाचे प्रयोग, रंगभरण स्पर्धा, पर्यावरणीय कुटुंब अंतर्गत एक लाख कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप, माहिती तंत्रज्ञानावर आधारीत ५० प्रकल्प, शतक महोत्सवाची सुवर्ण पाने, शतकमहोत्सवी ग्रंथ, लघुपट आदींचे नियोजन करण्यात आल्याचे काकतकर यांनी सांगितले.