जळगाव : शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सेक्टर डीमधील मौर्या केमिकल कंपनीमध्ये बुधवारी सकाळी मोठा स्फोट झाला. त्यामुळे कंपनीला आग लागली आहे. या भीषण आगीत २० पेक्षा अधिक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा दाखल झाली असून, जखमी असलेल्यांना तीन रुग्णवाहिकांतून रुग्णालयात दाखल केले जात आहे. शहरातील सर्व रुग्णालयांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा…“डाॅ. शोभा बच्छाव या बाहेरील कशा ?”, बाळासाहेब थोरात यांची आरोप करणाऱ्यांना फटकार

निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार घटनास्थळी, जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली जात असून, आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आगीत मोठी हानी झाल्याची भीती आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.