तलाठी सजांची व महसूल मंडलाची पुनर्रचना करावी, तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजाचे योग्य प्रशिक्षण द्यावे आदी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी मंगळवारपासून संपावर गेल्यामुळे शेती व जमिनीशी संबंधित सातबारा नोंदी आणि शैक्षणिक दाखले मिळविण्याचे काम ठप्प झाले.
मागील आठवडय़ात तलाठी, मंडल अधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला होता. जिल्हा प्रशासनास बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला. मात्र प्रशासनाने त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. मंगळवारपासून नाशिक जिल्ह्य़ातील तलाठी व मंडल अधिकारी असे एकूण ५३६ अधिकारी मंगळवारपासून संपात सहभागी झाले. सातबारा संगणकीकरण, ई-फेरफारसंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत जमाबंदी आयुक्तांना वेळोवेळी कल्पना दिली गेली. संगणकीय प्रणालीतील तांत्रिक दोषाकडे लक्ष वेधले. तसेच अवैध गौण खनिज वसुली कामातून तलाठी संवर्गास वगळावे, तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय बांधून द्यावे, २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांनी राखून ठेवावी आदी मागण्या केल्या. महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, अंशदायी निवृत्ती योजना आदींबाबत महसूलमंत्र्यांनी आश्वासन देऊनही त्याची पूर्तता झाली नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. शासनाकडून मागण्यांची पूर्तता केली जात नसताना दुसरीकडे कामाचा अतिरिक्त ताण वाढवला जात आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र शेतकऱ्यांची आबाळ होऊ नये यासाठी ज्या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो व गुरांच्या छावण्या आहेत तेथील तलाठी संपावर राहूनदेखील टँकरवर देखरेख व छावणी तपासणीचे काम करतील. संघटना चर्चेसाठी तयार आहे. शासनाने हा विषय प्रतिष्ठेचा न करता मागण्या सोडवाव्यात.
मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संप सुरू राहणार असल्याचे तलाठी संघटनेचे अध्यक्ष निळकंठ उगले यांनी सांगितले. दरम्यान, दाखले मिळवण्याची प्रक्रिया संगणकीय झाली असली तरी तलाठी संपावर गेल्यामुळे जून महिन्यात पावसाच्या सुरुवातीस होणाऱ्या खरीप हंगामासाठी लागणारे कर्ज, त्यासाठी आवश्यक सातबारा, जमिनीवर बोजा याचा तपशिलासह अन्य काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळवण्यात अडचणी येणार आहेत. विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक दाखले मिळविण्याच्या अडचणींना तोंड द्यावे लागेल, अशी चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

 

Letter of district officials of Khed to Election Commission regarding Collector Dr Suhas Diwas Pune
जिल्हा प्रशासनात ‘लेटर बॉम्ब’ : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंचे राजकीय नेत्यांची घनिष्ठ संबंध; खेडच्या प्रांताधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाला पत्र
Vijay Wadettiwar eknath shinde
“शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप!” माजी आरोग्य अधिकाऱ्याचं पत्र शेअर करत वडेट्टीवारांचा हल्लाबोल
pune accident case
पुणे पोर्श कार अपघात प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकाकडून पत्रकारांना धक्काबुक्की; पोलीस आयुक्तालयात घडला प्रकार
Construction of counting facilities in Kolhapur will be completed ten days earlier
कोल्हापुरात मतमोजणी सुविधांची उभारणी दहा दिवस आधीच पूर्ण होणार; जिल्हाधिकारी, अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देश
Show cause notice to three officials of Kolhapur Municipal Corporation in the case of disturbance in road work
कोल्हापूर महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना दणका; रस्ते कामातील सावळा गोंधळ प्रकरणी कारणे दाखवा नोटीस
Chhatrapati Sambhajinagar, Asha Worker Arrested, Asha Worker Arrested in Illegal Abortion, Two Detained, illegal abortion, illegal abortion in Chhatrapati Sambhajinagar,
छत्रपती संभाजीनगर : अवैधरीत्या गर्भपात जाळे चालवणारी आशा कार्यकर्तीसह तिघे अखेर गजाआड
supreme court finds newsclick founder prabir purkayastha s arrest invalid
अन्वयार्थ : तपास यंत्रणांना ताशेरेच हवेत?
Ghatkopar hoarding collapse marathi news, Ghatkopar ndrf rescue marathi news
संयमाची कसोटी… तळपते ऊन, कोंदट वातावरणात एनडीआरएफच्या जवांनाची अविरत सेवा