दोन्ही पक्षांच्या सत्ताकाळाची तुलना करण्याचे राज ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

नाशिक : कुठलीही यंत्रणा लोकांसाठी असते. महापालिकेत मनसेच्या सत्ताकाळात काय कामे झाली आणि नंतर काय झाले, हे नाशिककरांना समजायला हवे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे सांगितले. मनसेच्या शहर आणि जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नूतन पदाधिकाऱ्यांसह १२२ नवनियुक्त शाखाध्यक्षांची यादी जाहीर केली तसेच कार्यकर्त्यांना लोकसंग्रह वाढविण्याचे आवाहनही केले.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास

गुरुवारी राज यांच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा पार पडला. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष संघटनेत अनेक फेरबदल करण्यात आले. महापालिकेतील मनसे आणि नंतर भाजपच्या काळातील स्थिती याबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नावर त्यांनी भाजपचा नामोल्लेख न करता नागरिकांनी दोन्ही पक्षांच्या सत्ताकाळातील तुलना करावी, असे सूचित केले. महापालिकेत पाच वर्षांत मनसेचा प्रभाव दिसला नसल्याबाबत त्यांनी आता तो दिसेल असे नमूद केले. पक्षातील काही नेमणुका झाल्या असल्या तरी आणखी काही होणे अद्याप बाकी आहे. लवकरच पुन्हा नाशिकचा दौरा करून संघटनात्मक बाबी पूर्ण करणार आहे. पक्षात समन्वयक या नवीन पदाची निर्मिती करण्यात आल्याचे ते म्हणाले.

नमस्कार देखील हात आखडल्यासारखा करता तसे करू नका. लोकांना हा आपला आहे, असे वाटले पाहिजे.   शाखा कुठे असावी यासाठी उद्यापासून जागा शोधा. मनसेच्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराचे एकही आरोप झाले नव्हते. तो आपला प्रामाणिकपणा होता.

स्पष्टवक्ता आणि उद्धट वक्ता यात फरक आहे. हे समजून वागण्याची सूचनाही त्यांनी केली. शाखाध्यक्षानंतर गटाध्यक्ष नेमले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्ष संघटनेत फेरबदल

मनसेने पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांना शहर अध्यक्षपदी तर, अंकुश पवार यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. अ‍ॅड. रतनकुमार इचम यांचेही जिल्हाध्यक्षपद कायम ठेवण्यात आले आहे. सचिन भोसले यांना शहर समन्वयक पद देण्यात आले आहे. नूतन कार्यकारिणीत शहरातील सहाही विभाग अध्यक्षांना पदावर कायम ठेवले गेले. मेळाव्यात १२२ नवनियुक्त शाखा अध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली.