बदलापूरातील युवाहित कारणी संस्थेतर्फे अंधासाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अंधासाठी बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचा हा अनोखा उपक्रम असून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले. या स्पर्धेसाठी वयाची अट नसून सध्या १०० मुलांनी या स्पर्धेसाठी आपले नाव नोंदवले आहे. २० डिसेंबरला रविवारी सकाळी ९.३० वाजता बदलापूर पश्चिमेकडील स्कायवॉकवर ही स्पर्धा पार पडणार आहे. यावेळी स्कायवॉकवर भारत व्यसन मुक्ती अभियानातर्फे विविध संदेश फलक लावण्यात येणार आहेत. नगराध्यक्ष वामन म्हात्रे व उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन तर बदलापूर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक नारायण शेळके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल. संपर्क- ९८६७५१४१०४
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2015 3:00 am