09 August 2020

News Flash

रिक्षात महिलेचे मंगळसूत्र खेचले

तीन आसनी रिक्षातून प्रवास करत असताना एका महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाख रुपये

तीन आसनी रिक्षातून प्रवास करत असताना एका महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाख रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरील दुकलीने खेचून पोबारा केल्याची घटना रविवारी दुपारी पनवेल-उरण मार्गावर घडली. जुई-कामोठे गावात राहणाऱ्या चंद्रा कडू या आपल्या पती व मुलासोबत रिक्षातून बामणडोंगरी येथे लग्नसमांरभाला जात असताना ही घटना घडली. यशवंत कडू यांची स्वत:ची रिक्षा आहे. पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरील करंजाडे टोलनाक्यापासून काही अंतरावर हा प्रकार घडला. चंद्रा यांचे मंगळसूत्र तीन लाख ६५ हजार रुपये किमतीचे होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन घाडगे हे टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फूटेजवरून चोरांचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2016 12:03 am

Web Title: mangalsutra robbery in navi mumbai
Next Stories
1 द्रोणागिरी नोडमधील भूखंडाच्या दराची कोटीकडे वाटचाल
2 कळंबोलीत दीड हजार पथदिवे बंद
3 तीन आसनी रिक्षा परवान्यासाठी मराठीचे ज्ञान हवे
Just Now!
X